बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन एक सामन्य समस्या मानली जाते. मात्र ही समस्या अनेकांना दैनंदिन जीवनात प्रचंड त्रासदायक ठरते. पोट साफ न होण्याच्या समस्येमुळे आपल्याला शारीरिक त्रास तर होतोच मात्र याशिवाय काहींना याच्या मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागतं. याचं कारण असं की, जर आपले पोट साफ नसेल तर आपल्याला फ्रेश वाटत नाही. यामुळे दिवसभर आपल्याला कोणतंही काम करावेसं वाटत नाही.
या समस्येमध्ये रूग्णांना पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे आपल्याला काहीही खावेसं वाटत नाही. बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नाही आणि त्यामुळे हळूहळू गॅस, ॲसिडिटी आणि पचनाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. तुमचं पोट अधूनमधून साफ होत असेल आणि तुम्हाला या समस्येने बराच वेळ त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. झोपण्यापूर्वी काही सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचं पोट साफ होण्यास मदत होऊ शकते.
अन्नामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर नसल्यामुळे पचनक्रिया मंदावू शकते.
शरीरात पाण्याची कमतरता हे बद्धकोष्ठतेचं मुख्य कारण असू शकतं.
खाण्या-पिण्याच्या योग्य सवयी नसणं आणि झोपण्याची-उठण्याची वेळ नसणं यामुळे देखील ही समस्या वाढू शकते.
मानसिक आरोग्याचा तुमच्या पाचन संस्थेवर विपरीत परिणाम होत असतो.
पोट सतत जड वाटणं
मल त्याग करणं कठीण होणं
गॅस
पोटदुखी
भूक न लागणं
पोट साफ न होणं
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध लिंबू पिळून प्या. हे प्यायल्याने तुमचं पाचन तंत्र एक्टिव्ह करतं. यामुळे तुमचं पोट साफ होण्यास मदत होते.
त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदात बद्धकोष्ठतेवर उत्तम उपाय मानण्यात आलं आहे. यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेऊन प्या. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
रात्री पाण्यात 2-3 अंजीर आणि 4-5 मनुके भिजवून ठेवा. त्यानंतर यांचं सेवन करा. यामुळे पोट सहज साफ होण्यास मदत करते.
झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध एक चमचा गाईचं तूप मिसळून प्या. हे तुमच्या आतड्यांसाठी फायदेशीर ठरतं. यामुळे त्यांची हालचाल होण्यास मदत होते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.