Laung che Upay saam tv
लाईफस्टाईल

Laung che Upay: आर्थिक तंगीने त्रासताल? शुक्रवारी लवंगचे ४ अचूक उपाय करा, चुंबकासारखा पैसा येईल घरी

Shukrawar che Upay: लवंग केवळ किचनमध्ये पदार्थामधील स्वाद वाढवत नाही तर जीवनातील छोट्या छोट्या उपायांसाठी देखील कामी येते. या उपायांनी तुमच्या आयुष्यात भरभराट होण्यास मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय परंपरेमध्ये लवंग केवळ एक मसाल्याचं रूप नसून वास्तूच्या कामांसाठी देखील याचा वापर केला जातो. शुक्रवारी या मसाल्याच्या पदार्थांचं महत्त्व अधिक वाढतं. शुक्रवारच्या दिवशी मां लक्ष्मीची पुजा केली जाते आणि असं मानलं जातं की या दिवशी लक्ष्मीची पुजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. याशिवाय घरातील वातावरण देखील चांगलं राहतं.

आज शुक्रवारच्या दिवशी लवंगाचे तुम्ही खास उपाय केले जाऊ शकतात, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. या उपयांमुळे तुमचे कोणत्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते परत मिळतील याशिवाय सदैव तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहू शकते.

आर्थिक परिस्थिती सुधारेल

जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या कमतरतेला सामोरं जात असाल तर आज हा उपाय करून पाहा. यामध्ये लक्ष्मीची पुजा करताना तिच्या पायाशी गुलाबाच्या फुलासोबत २ लवंग चढवा. पुजेनंतर ही दोन लवंग तुमच्या पर्समध्ये ठेवा. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा येण्याची शक्यता आहे.

नकारात्मकता दूर होते

घरात होणारे सततचे तणाव, भांडणं होत असतील तर हे निगेटीव्ह एनर्जीचे संकेत आहेत. यासाठी आज संध्याकाळी ५ लवंग. ३ कापूर आणि ३ मोठी वेलची एका मातीच्या भांड्यामध्ये ठेऊन त्या भांड्याला जाळा. ज्यावेळी दूर येईल तेव्हा तो पूर्ण घरामध्ये पसरव. यानंतर राखमध्ये पाणी मिसळू घराच्या दरवाजावर शिंपडा. यामुळे घरातील वातावरण चांगलं राहतं.

नात्यात गोडवा

जर घरात कोणत्याही कारणास्तव मतभेद जाणवते असतील तर शुक्रवारच्या दिवशी तमालपंत्रांवर लगंव ठेवा आणि त्यांना जाळून टाका. याचा धूर घरात पसरवून उरलेली राख दाराजवळ ठेवा. यामुळे घरातील वातावरण सुधारण्यास मदत होऊ शकते.

सुख-शांती ठेवण्यासाठी काय करावं?

शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करताना दोन किंवा पाच लंवग अर्पण करा. यावेळी पूजा संपल्यानंतर या लवंग तुमच्या पर्समध्ये ठेवा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले; टी-२० सिरीजमध्ये टीम इंडिया २-१ ने आघाडीवर

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT