Home Remedies For Cough Saam Tv
लाईफस्टाईल

Cold Cough Remedies: मुलं सर्दी-खोकल्याने आहेत हैराण? मग सिरप कशाला? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Child Care: बदलत्या हवामानात लहान मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही घरगुती उपाय आणि काळजी घेऊन मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवता येते.

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या हवामानामुळे लहान मुलांना सर्दी-खोकल्याचा धोका

घरगुती उपाय आणि योग्य आहाराने मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ

१ वर्षाखालील मुलांना मध देणं टाळा

खोकला वाढल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या

लहान मुलांच्या आरोग्यावर बदलत्या वातावरणाचा परिणाम लगेचच दिसू लागतो. कारण आता पावसाळा परतीचा प्रवास सुरु करत आहे. त्यामुळे लहान मुलांना सर्दी-खोकला अशा समस्यांना समारे जावे लागू शकते. सर्दी- खोकला ही समस्या जरी सामान्य वाटली तरी त्यामुळे मुलांना त्याचा त्रास होत असतो. पुढे आपण यावर घरगुती उपाय काय करु शकतो? आणि बदलत्या वातावरणात मुलांची काळजी कशी घ्यायची याबद्दल जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञांच्या मते, सगळ्यात आधी मुलांना वाफ द्यावी. अगदी बाळाला सुद्धा सर्दी झाली की वाफ दिली जाते. या ऐवजी तुम्ही रुममध्ये ह्युमिडिफायर घरामध्ये लावू शकता. जर मुलांचे वय हे १ वर्षापेक्षा जास्त असेल तर मध चाखालया द्यावे. त्याने घशातला कफ कमी होतो आणि खोकल्यापासून आराम मिळतो. लक्षात ठेवा १ वर्षापेक्षा लहान मुलांना अजिबात मध देऊ नका. त्याने पोटात गरम पडू शकतं. तसेच बाळाची रुम स्वच्छ ठेवा. धूळ असेल तर लगेचच साफ ठेवा.

मुलांना जास्त कफ झाल्यास काय कराल?

१. तज्ज्ञांच्या मते, मुलांना जर कफ झाला तर त्यांच्या खाण्यात काही बदल झालेला असतो. त्यावेळेस त्यांना घरगुती भाज्यांचे सूप, लापशी, कोमट दूध, फळे, ज्यूस आणि हिरव्या भाज्यांमॅश करुन द्याव्यात. त्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत होते.

२. लहान मुलांना तुम्ही भरपूर पाणी दिले पाहिजे. त्याने शरीरात आणि घशात ओलावा राहतो. कारण घसा कोरडा पडत असेल तर त्यांना खोकला होऊ शकतो.

३. लहान मुलांना जास्त तेलकट पदार्थ, पुरी, नळ्या, फेण्या, चॉकलेट्स, थंड पेय देण्यापासून रोखले पाहिजे.

४. ज्या मुलांना सतत एलर्जी होते त्यांना डेअरी प्रोडक्ट देणं टाळलं पाहिजे. तर घरातील पौष्टीक पदार्थ हातात खाऊ म्हणून देऊ शकता.

५. जर लहान मुलांची सर्दी आणि खोकला वाढत असेल तर त्यांना मनाने सिरप देणे टाळले पाहिजे. तज्ज्ञांचा सल्ला आणि औषधे ही त्यांच्या योग्य ठरतात. अन्यथा काही दिवसात मुलांना श्वास घ्यायला त्रास, निराशा आणि अशक्तपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

SCROLL FOR NEXT