Chhatrapati Shahu Maharaj Jayanti wishes  SAAM TV
लाईफस्टाईल

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti wishes : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पाठवा खास संदेश!

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2024 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 26 जून रोजी जयंती. त्यानिमित्त हे खास शुभसंदेश आपल्या नातलगांना आणि मित्रांना पाठवू शकता.

Shreya Maskar

दीन-दलित आणि शोषित वर्गाचे तारणहार राजर्षी छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. छत्रपती शाहू महाराजांनी 28 वर्षे कोल्हापूरचा कारभार पाहिला. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात अनेक सुधारणा घडवून आणल्या. आपल्या राज्यात मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. तसेच वैदिक शाळांची स्थापना देखील केली. संस्कृत शिक्षणाचा प्रचार केला. धर्मग्रंथ शिकण्यास सर्व जातीतील विद्यार्थांना प्रेरित केले.

शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बालविवाह प्रथा बंद करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अनेक नावाने संबोधले जायचे. उदा. राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू. यशवंतराव हे शाहू महाराजांचे मूळ नाव होते. अशा महान लोकराजाच्या जयंतीनिमित्त आपले नातेवाईक आणि मित्रांना शुभसंदेश पाठवून छत्रपती शाहू महाराज यांचे विचार घरोघरी पोहचवता येऊ शकतात.

शुभसंदेश पाठवा!

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन

  • अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवताला त्रिवार मानाचा मुजरा, छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

  • जातीभेद निर्मूलन ते शेतीचा विकास करणाऱ्या राजाला मानाचा मुजरा

  • वंचित समाजाचे रक्षक छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

  • शोषितांचे तारणहार, महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांना कोटी कोटी अभिवादन.

  • बहुजन समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन!

  • भटक्या जमातीचे आधारस्तंभ असलेल्या छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Gold Rate Today: गुढीपाडव्या आधी सोन्याने उच्चांक गाठला, सोनं १२००० रुपयांनी महागलं; वाचा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

Urine Infection Home Remedies: युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय? हे 5 घरगुती उपाय करा

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT