Chanakya Niti On Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relationship : नात्यांना मजबूत आणि सुदृढ करण्यासाठी या गोष्टींचे नियमीत पालन करा, पाहा चाणक्यांचे मत

Relationship : आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये नातेसंबंध मजबूत करण्यासाठी चार गोष्टींवर विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.

Shraddha Thik

Chanakya Niti :

राज्यशास्त्रात निपुण असलेल्या आचार्य चाणक्य यांचे शब्द यशस्वी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचे शब्द ऐकायला खूप कठोर असतील पण ते आत्मसात केले तर यशस्वी जीवन जगता येते.

आपल्या व्यस्त जीवनात (Life) आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु हे शब्द आपल्याला जीवनाच्या प्रत्येक अडचणींमधून बाहेर येण्यास मदत करतील. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये नातेसंबंध मजबूत करण्यासाठी चार गोष्टींवर विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येकाला आनंदी ठेवणे शक्य नाही परंतु याचा अर्थ असा नाही की, फसवणूक आणि छळ करून नाते मजबूत होते. त्याएवजी फसवणूक आणि कपट नात्याचा पाया कमकुवत करतात.

आचार्य चाणक्य स्पष्ट करतात की नाते मजबूत करण्यासाठी प्रेम (Love) आणि विश्वास असणे खूप महत्वाचे आहे.

आचार्य चाणक्यांच्या नीतींनुसार माणसाच्या बोलण्यातला गोडवा त्याला सर्वांमध्ये प्रसिद्ध बनवतो. प्रत्येकाला त्याच्या जवळ राहायचे आहे. गोड बोलणारी माणसं सगळ्यांना प्रिय असतात. त्यामुळे नाते (Relationship) घट्ट करण्यासाठी बोलण्यात गोडी ठेवा.

आचार्य चाणक्य यांच्या मते, नातेसंबंधांमध्ये अहंकार सोडला पाहिजे. अनेक चांगली नातीही अहंकारामुळे तुटतात. चाणक्याच्या मते, व्यक्तीचा अहंकार कधीही नात्यापेक्षा मोठा नसावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranjeet Kasle : झुकेगा नहीं.. बीडच्या रणजीत कासलेच्या मुसक्या आवळल्या, अटक करताच केली पुष्पाची स्टाईल

Diwali 2025: दिवाळीच्या दिवशी 'ही' 5 कामं नक्की करा; घरात लक्ष्मीचं होईल आगमन

Gold Rate: १० वर्षात १ लाखानं वाढलं सोनं, २०१५ मध्ये किती रूपये तोळा होतं गोल्ड? वाचा १०० वर्षाचा इतिहास

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा असंवेदनशीलतेचा कळस, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस!

SCROLL FOR NEXT