Chanakya Niti For Parents Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti : मुलांच्या सवयी बिघडवतात असे पालक, चाणक्यांनी सांगितल्या या गोष्टी, वाचा सविस्तर

Chanakya Niti For Parents : प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना चांगले संस्कार शिकवायचे असतात, जेणेकरून ते मोठे झाल्यावर त्यांचा अभिमान वाटू शकेल. यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करतात, पण आचार्य चाणक्य म्हणतात की, काही वेळा मुलांना बिघडवण्यात पालकांचा मोठा हात असतो.

Shraddha Thik

Parenting Tips :

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना चांगले संस्कार शिकवायचे असतात, जेणेकरून ते मोठे झाल्यावर त्यांचा अभिमान वाटू शकेल. यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करतात, पण आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, काही वेळा मुलांना बिघडवण्यात पालकांचा मोठा हात असतो.

चला जाणून घेऊया कुटुंबातील सदस्यांच्या त्या कोणत्या सवयी (Habits) आहेत, ज्या आजच सोडल्या पाहिजेत, अन्यथा तुमच्या मुलांवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

अशी भाषा वापरू नका

पालकांनी मुलांसमोर कधीही कठोर किंवा अपमानास्पद भाषा वापरू नये. कारण मुलं हीच वागणूक त्यांच्या पालकांकडून शिकतात. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात की मुलांसमोर तुमचे बोलणे नेहमी गोड ठेवा. जेणेकरून तुमची मुलेही मृदुभाषी होतील.

खोटे बोलण्याची सवय

जर पालकांना प्रत्येक संभाषणात खोटे बोलण्याचे व्यसन असेल तर ही सवय तुमच्या मुलांमध्येही जाऊ शकते. ज्यामुळे भविष्यात त्यांचे नुकसान होईल. अशा स्थितीत आचार्य चाणक्य सांगतात की, जर कोणी पालक खोटे बोलत असेल तर त्यांनी ही सवय आजच सोडून द्यावी, अन्यथा मुलेही या वाईट सवयीला बळी पडू शकतात.

अनादर

जर पालक केवळ मुलांशीच नव्हे तर एकमेकांशी आदराने वागले तर मुले देखील तीच वागणूक शिकतात. या वाईट सवयीमुळे मुले भविष्यात कोणाचाही आदर करू शकत नाहीत, त्यामुळे भविष्यात त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी स्वतः ही सवय सोडून द्या आणि मुलांना इतरांचा आदर करायला शिकवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT