Chanakya Niti On Women Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women : या महिलांवर चुकूनही विश्वास ठेवू नका, आयुष्यभर पश्चातापाची वेळ येईल

Women Nature : आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा स्वभावाच्या स्त्रियांशी व्यक्तीने सावधगिरी बाळगली पाहिजे.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : स्त्रीला सर्वगुण संपन्न मानले जाते. स्त्री हा घराचा पाया असाला तरी तिच्यातील काही गुण हा अनेकांना न पटण्यासारखे असतात. कोणत्याही नात्यात समंजसपणा असला तर ते नातं अधिक दृढ होत जाते.

आचार्य चाणक्य म्हणतात की. स्त्रियांचा स्वभाव, त्यांची विचारसरणी आणि ते कोणत्या वेळी कसे वागतात. या विषयी सांगितले आहे. कोणत्याही नात्यात गोडवा टिकवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याचाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय व्यक्तीचा स्वभाव, गुण याविषयी त्यांनी सविस्तरपणे सांगितले आहे. जाणून घेऊया कोणत्या स्वभावाच्या महिलांवर विश्वास ठेवू नये ते

1. भ्रष्ट

आचार्य चाणक्य (Chanakya) यांच्या मते, भ्रष्ट आणि वाईट चारित्र्य असलेल्या स्त्रीवर कधीच विश्वास ठेवू नका, अशी स्त्री कधीही विश्वासार्ह नसते. ती नेहमी इतर पुरुषांकडे आकर्षित होते. अशा परिस्थितीत तिचा नवरा हा तिच्यासाठी सर्वात मोठा शत्रू असतो कारण तिथे तो तिच्या हेतूंमध्ये अडथळा बनतो.

2. सौंदर्य

स्त्रीचे (Women) सौंदर्य पाहून तिच्यावर विश्वास ठेवणे ही मोठी चूक ठरू शकते. बाह्य सौंदर्यापेक्षा तिच्या गुणांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, सौंदर्यापेक्षा स्त्रीच्या संस्कृतीला आणि शिक्षणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. ज्या स्त्रीचा धर्मावर फारसा विश्वास नाही अशा स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नका.

3. लोभी

आचार्य चाणक्य यांच्या मते स्त्रीमध्ये लोभाची भावना खूप घातक असते. यामुळे घरातील शांतता तर बिघडतेच, पण कधी कधी संपूर्ण कुटुंबाच्या नाशाचे कारणही बनते.

4. गर्विष्ठ

गर्विष्ठ स्त्री ही घर (Home) उद्धवस्त करणाऱ्या असतात. माता सरस्वती आणि माता लक्ष्मी दोघीही गर्विष्ठ स्त्रीवर रागावतात. अशा परिस्थितीत तिला तिच्या ज्ञान-बुद्धीचा वापर करता येत नाही. त्याचबरोबर त्याच्या अशा वागण्याने सुख-समृद्धीही नष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT