Chanakya Niti On Successful Life Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Successful Life : या 3 रहस्यमयी वाक्यांमध्ये दडला आहे सुखी जीवनाचा मंत्र

Successful Life : आचार्य चाणक्य यांनी जीवनातील तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आपल्या व्यस्त जीवनात जरी आपण आचार्य चाणक्यांच्या धोरणांकडे लक्ष दिले तरी त्यातले काही शब्द आपल्याला जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर मदत करतील. चाणक्य म्हणतात की कठोरता हे जीवनाचे सत्य आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया चाणक्याने काय सांगितले- चाणक्याने तीन गोष्टी सांगितल्या आहेत. या तीन गोष्टी आहेत - चुका करणे हा स्वभाव आहे, त्या स्वीकारणे ही संस्कृती आहे आणि सुधारणे ही प्रगती असते.

चुका करणे हा स्वभाव आहे

चाणक्य म्हणतात की, चुका करणे हा स्वभाव आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही मनुष्याकडून चुका होऊ शकतात. ही चूक (Fault) कोणत्याही प्रकारची असू शकते. पण ती चूक तुम्ही मान्य करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चूक मान्य केली नाही तर ती चूक पुन्हा होईल. पण जर तुम्ही तुमची चूक मान्य केली तर असे केल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या (Problem) बर्‍याच प्रमाणात कमी होतील.

स्वीकारणे ही संस्कृती आहे

चाणक्य म्हणतात की, स्वीकार करणे ही संस्कृती आहे. चाणक्याच्या मते, जर तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती चूक मान्य करा. आपली चूक मान्य केल्याने कोणी लहान किंवा मोठा होत नाही. असे केल्याने तुम्ही इतरांच्या नजरेत उंच व्हाल.

सुधारणा करणे म्हणजे प्रगती

सुधारणा करणे म्हणजे प्रगती असे चाणक्य मानतात. जर एखाद्या व्यक्तीने चूक केली असेल तर ती चूक मान्य करणे महत्त्वाचे आहे. पण त्या चुकातून शिकून पुढे जाणेही तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. परंतु कोणत्याही चुकीपासून शिकले पाहिजे. असे केल्यानेच जीवनात पुढे जाता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; ६५ जण जखमी

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

Gokul Election: 'गोकुळ'चं राजकारण तापलं, भाजप अन् महाडिक गटाला डावलणं सत्ताधाऱ्यांच्या अंगलट?

SCROLL FOR NEXT