Chanakya Niti Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Saving Money: सतत हातात खेळता राहिल पैसाच पैसा ! फक्त चाणक्यांच्या या गोष्टींचे लक्षात ठेवा

Saving Tips : चाणक्यच्या मते, पैसा मिळवण्यासाठी जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ते खर्च करणेही महत्त्वाचे आहे.

कोमल दामुद्रे

Money Tips : चाणक्यांनी खर्च, उपभोग आणि गुंतवणूक या विषयावर आपले विचार तपशीलवार मांडले आहेत. चाणक्यच्या मते, पैसा मिळवण्यासाठी जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ते खर्च करणेही महत्त्वाचे आहे.

परंतु चाणक्यांच्या धोरणात पैशाच्या (Money) बाबतीत माणसांने केव्हा आणि कुठे सावध राहावे, हे देखील सांगितले आहे. त्यांचा अवलंब करून तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत बनू शकत नाही, तर तुम्ही एक यशस्वी (Success) व्यक्ती देखील बनू शकता.

चाणक्य म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर त्याला पैशाचा खर्च आणि ते वाचवण्याचे मार्ग माहित असायला हवे. आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे वाचवणे अयोग्य आहे. चाणक्‍याने उदाहरण दिले आहे की, तलावाचे पाणी जसे एका जागी जास्त वेळ राहिल्यास ते कुजते. त्याचप्रमाणे पैसे जास्त काळ ठेवल्याने त्याचे महत्त्वही कमी होते. दान हा पैसा खर्च करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. दानाने पैसा कमी होत नाही तर दुप्पट होतो. योग्य गोष्टींमध्ये पैसा गुंतवावा. हे संपत्तीच्या संरक्षणासारखेच आहे.

1. सुरक्षित भविष्यासाठी पैसे वाचवा

चाणक्य म्हणतात की, पैशाचा चांगला वापर केला पाहिजे, परंतु सुरक्षित भविष्यासाठी अनावश्यक खर्चाला आळा घालणे खूप महत्वाचे आहे. कमाईचा काही भाग दान करा तसेच पैसे गुंतवणुकीसाठी वापरा. आजच्या काळाबद्दल सांगायचे तर, विमा, आरोग्य (Health) योजना, शिक्षण योजनांमध्ये गुंतवणूक करा, ते केवळ कठीण काळात तुमची साथ देत नाहीत तर तुमचे भविष्य देखील सुधारतील.

2. पैशांचा आणि अहंकाराचा लोभ बाळगू नका

पैशाच्या लोभापायी माणूस चुकीच्या मार्गावर जातो. पैसा मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होतो आणि कधीच आनंदी होऊ शकत नाही. चाणक्य म्हणतो की पैसा आला की गर्व करू नका. जे आपली संपत्ती दाखवतात ते गरिबीच्या उंबरठ्यावर येतात.

3. ही एक चूक राजाला रंक बनवते

पैसा नेहमी योग्य मार्गाने मिळवावा, कारण चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा काही काळासाठीच आधार देतो. चाणक्याच्या मते, अनैतिक पद्धतीने केलेली कमाई लवकर नष्ट होते, अशा पैशाचे आयुष्य फक्त दहा वर्षे असते. या 10 वर्षांतही माणसाची संपत्ती पाण्यासारखी वाहत असते. एक ना एक कामात अनावश्यक खर्च करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT