Chanakya Niti On Women Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women : या स्वभावाच्या स्त्रियांची इच्छा नेहमीच राहाते अपूर्ण, चाणक्यांनी सांगितले कारण

Women Nature : आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा स्वभावाच्या स्त्रियांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहातात.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti :

स्त्री ही घराचा भक्कम पाया असते. तिच्याशिवाय सगळेच अपूर्ण. स्त्रीला सर्वगुण संपन्न म्हटले जाते. स्त्रीला अधिक साहसी आणि धैर्यशील म्हटले जाते. परंतु, काही वेळेस या स्त्रियांचा स्वभाव अनेकांना न पटण्यासारखा असतो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, स्त्रियांचा स्वभाव, त्यांची विचारसरणी आणि त्या कोणत्या वेळी कशा वागतील हे सांगता येत नाही. त्यामुळे कधीकधी आयुष्यात त्या अनेक चुका करतात ज्यामुळे नंतर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते. चाणक्य म्हणतात की, अशा स्वभावाच्या स्त्रियांची इच्छा नेहमीच अपूर्ण राहाते. जाणून घेऊया त्याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. सतत पुरुषावर अवलंबून राहाणे

चाणक्य म्हणतात की, पत्नीने पतीची (Husband) साथ कधीच सोडू नये. ते म्हणतात की, आताच्या स्त्रिया अनेक मोठ्या पदावर आणि उच्च शिक्षित आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यातले योग्य निर्णय घ्यावे. त्यांनी स्वावलंबी बनायला हवे.

2. पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिवान

चाणक्यांच्या मते, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या स्त्रिया कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्याप्रकारे पार पाडतात. आपल्या बुद्धीने प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकतात. त्यासाठी स्त्रियांनी (Women) शिकणे गरजेचे आहे.

3. धैर्यवान

महिला या पुरुषांपेक्षा (Men) कमी ताकदवान असतात परंतु, त्या अधिक धैर्यवान देखील असतात. त्यामुळे धैर्याने कोणत्याही गोष्टीला तोंड देता येऊ शकते. त्यासाठी स्त्रियांच्या स्वभावात धैर्यवान हा गुण अवश्य आहे. अन्यथा त्यांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT