Chanakya Niti About Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti About Parenting Tips : पालकांनो, किशोरवयीन मुले सतत चिडचिड करतात? या पद्धतीने हाताळा

Chanakya Niti : चाणक्यांच्या मते किशोरवयीन वयातील मुलांना हाताळताना पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.

कोमल दामुद्रे

Parenting Tips :

अगदी बालवयापासूनच पालक आपल्या मुलांना प्रेमाने वाढवतात. परंतु, मुले किशोरवयीन वयात आल्यानंतर अनेकदा तक्रार करतात. ज्यावेळी मुलांना असे वाटते तेव्हा त्यांच्या पालकांपासून गोष्टी लपवू लागतात आणि घरात वाद होतात.

चाणक्य म्हणतात की, किशोरवयीन वयातील मुले अनेकदा चिडचिड करु लागतात. पालकांचे ऐकत नाही. पालकांचे आपल्या मुलांवर प्रेम असते परंतु, कधीकधी काही चुकामुळे ते त्यांच्यावर ओरडतात. चाणक्यांच्या मते किशोरवयीन वयातील मुलांना हाताळताना पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मित्र व्हा

किशोरावस्थेत असताना मुलांमध्ये (Child) शारीरिक आणि मानसिक बदल होतात. या वेळी मुलांना समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला, त्यांचे मित्र (Friend) होण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे ते अनेक गोष्टी ते आपल्या सोबत शेअर करतील.

2. प्रेम व्यक्त करा

मुले मोठी झाल्यानंतर त्यांना असे वाटते की, पालकांचे आपल्यावरील प्रेम कमी झाले आहे. त्यामुळे ते अबोल राहातात. अशावेळी पालकांनी त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवे. वेळोवेळी प्रेमही व्यक्त करायला हवे.

3. जबाबदार बनवा

किशोरावस्था हा वयाचा एक टप्पा आहे. ज्यामध्ये मुलांवर शैक्षणिक (Education) दबाव अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे त्यांची सतत चिडचिड होते. अभ्यासात काही अडचणी येत असतील तर मुलांना विचारत राहा. त्यांना जबाबदारी कशी हाताळायची हे शिकवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT