Cardiac Arrest Symptoms Saam Tv
लाईफस्टाईल

Cardiac Arrest Symptoms : कार्डियाक अरेस्टचा झटका कसा येतो? लक्षणे कोणती? कशी घ्याल खबरदारी?

Rituraj Singh Death : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यापूर्वी देखील अनेक अभिनेत्यांनी हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमुळे आपला जीव गमावला.

कोमल दामुद्रे

Heart Attack :

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यापूर्वी देखील अनेक अभिनेत्यांनी हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमुळे आपला जीव गमावला.

अचानक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) कसा येतो असा प्रश्न पुन्हा एकदा समोरे आला आहे. बदलेली जीवनशैली (Lifestyle), खाण्यापिण्याच्या सवयी, कामाचा ताण, प्रदूषण आणि झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना (Disease) बळी पडावे लागते.

सध्या हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. हा अटॅक कसा येतो. याची लक्षणे कोणती? खबरदारी कशी घ्याल जाणून घेऊया. हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा मिळाला नाही किंवा ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. वेळीच उपचार न मिळाल्यास जीवही गमवावा लागतो.

कार्डियाक अरेस्टचा झटका हा दीर्घकालीन हृदयविकाराशी संबंधित नाही. परंतु, हृदय रक्त पंप करणे थांबवते तेव्हा ही समस्या अचानक उद्भवते. हृदयाच्या आत वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन होते ज्यामुळे हृदयाचे ठोके थांबतात. जेव्हा असे होते तेव्हा काही मिनिटांत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

1. कार्डियाक अरेस्टची लक्षणे?

कार्डियाक अरेस्ट हा हृदयविकाराच्या इतर आजारांपेक्षा वेगळा असतो आणि अचानक होतो. त्यामुळे त्याची काही लक्षणे दिसत नाही. हृदयासंबंधित कोणताही आजार असेल त्यांना हा धोका अधिक जास्त असतो. हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, थकवा येणे किंवा ब्लॅकआउट सारखी लक्षणे दिसतात.

2. कार्डियाक अरेस्ट आल्यावर काय कराल?

जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्याला त्वरीत कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR)द्यावे. ज्यामुळे रुग्णांच्या हृदयाचे ठोके थांबण्यापासून रोखता येते. तसेच ठोके सुरळीत होण्यास मदत होतात. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाच्या हृदयाचे ठोकेही त्याला विद्युत शॉक देऊनही सुरळीत केले जातात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT