Makar Rashi 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Makar Rashi 2024 : नवीन वर्षात मकर राशींचे भाग्य खुलणार! करिअरमध्ये मिळणार नव्या संधी; वैवाहिक जीवनात अडचण

Makar Rashi Yearly Horoscope 2024 : मकर राशीचे भविष्य पुढील वर्ष अधिक चांगले राहाणार आहे. गुरु तुमच्या राशीतून चौथ्या नंतर पाचव्या घरातून प्रवेश करेल. येत्या वर्षात साडेसातीचा परिणाम हा काही प्रमाणात सकारात्मक असणार आहे. कसे असेल मकर राशींसाठी नवीन वर्ष जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Capricorn Rashibhavishya In Marathi 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे आपले वेगळे महत्त्व आहे. या राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनी हा कर्माचे फळ देणारा आणि न्यायाची देवता मानली जाते. त्यासाठी शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो.

यावर्षीच्या तुलनेत मकर राशीचे भविष्य पुढील वर्ष अधिक चांगले राहाणार आहे. गुरु तुमच्या राशीतून चौथ्या नंतर पाचव्या घरातून प्रवेश करेल. येत्या वर्षात साडेसातीचा परिणाम हा काही प्रमाणात सकारात्मक असणार आहे. कसे असेल मकर राशींसाठी नवीन वर्ष जाणून घेऊया.

करिअरच्या (Career) दृष्टीने नवीन वर्ष मकर राशीसाठी फायद्याचे आणि प्रगतीचे असेल. या वर्षीत नोकरीत (Job) बढती होईल. नोकरीच्या शोधात असाल तर नव्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न आणि योगदान ओळखले जाईल. व्यवसायात अधिक नफा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. करिअरमध्ये ब्रेक घेऊ नका.

आर्थिक बाबतीत सांगायचे झाले तर नातेवाईकांमधील उधारी आणि कर्जाचे व्यवहार टाळावे लागतील. वडिलोपार्जित मालमत्तेच्या प्रकरणात तणावपूर्वक (Stress) वातावरणाचा सामना करावा लागेल. व्यवसात प्रगती होईल. पैशांच्या मार्गात अडथळे येतील. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ राहिल.

आरोग्याच्या बाबतीत एकंदरीत हे वर्ष अनुकूल राहिल. गुरु पाचव्या घरात असल्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतील. सतत आजारी असणाऱ्या लोकांची तब्येत काही प्रमाणात सुधारेल. खाण्यापिण्याची काळजी घ्याल.

प्रेमी जोडप्यांसाठी येणारे वर्ष हे आनंददायी असणार आहे. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी एकरुप राहाल. वैवाहिक जीवन तणावाखाली राहिल. नात्यातील दूरावा कमी होईल.

गुंतवणूक करण्यासाठी मे महिन्यानंतरचा काळ अधिक लाभदायक ठरणार आहे. बढती किंवा पगारात वाढ होऊ शकते. नशीबाची साथ मिळेल. तसेच अचानक धनप्राप्ती होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT