Sleeping Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Sleeping Tips : शांत झोप लागत नाहीये ? 'हा' व्यायाम करा, लगेच जाणवेल फरक

आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sleeping Tips : आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही. काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही.(Health)

आपल्या झोपेवर ताबा मिळवण्यासाठी सवयी, व्यायाम प्रकार आणि आहार (Diet) कसा असावा हे जाणून घेऊ

ध्यानधारण करणे -

झोपेसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ध्यान

मंत्रोच्चार -

दिवसातून किमान एकदा तरी ओंकार करावा. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपण आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य विचार किंवा काळज्यांना दूर थोपवू शकतो.

योगासने करणे -

नियमितपणे योग साधना करणाऱ्या लोकांना झोपेचे कसलेच त्रास होत नाही. दिवसातून किमान वीस मिनिटं योगाची प्रॅक्टिस करून शरीर, मन स्वस्थ ठेवणं हा सवयीचा भाग बनून जातो.

मसाज करणे -

झोपेच्या समस्यांसाठी मसाज हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. नियमितपणे मसाज केल्याने झोपेचा दर्जा तर सुधारतोच पण मसाजमुळे टेन्शन, स्ट्रेस देखील दूर होतात.

ज्यामुळे शांत झोप लागण्यासाठी मदत होते.

मॅग्नेशियम -

आपल्या आहारातून अनेक प्रकारची खनिजे , व्हिटॅमिन आपल्या शरीरात जातच असतात. ह्यापैकी मॅग्नेशियम ह्या खनिजाची आपलाल्या चांगल्या झोपेसाठी गरज असते.

आवडते शांत संगीत ऐकणे -

संगीत हा नैसर्गिक पेनकिलर म्हणून ओळखले जाते. शांत संगीतात आपले दुखणे कमी करायची क्षमता असते.संगीतामुळे आपले मन शांत होते, शरीर सैल होते त्यामुळे आपल्याला झोप यायला सुरुवात होते.

झोप नीट येत नसेल, किंवा आली तरी सलग शांत झोप होत नसेल तर हे उपाय करून बघा. याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By : Shraddha Thik

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

No PUC NO Fuel : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! PUC नसेल तर पेट्रोल- डिझेल मिळणार नाही; कुठे लागू केला आहे निणर्य? वाचा

SCROLL FOR NEXT