Cancer Vaccine saam tv
लाईफस्टाईल

Cancer Vaccine: कॅन्सरविरोधात महिलांना मिळणार सुरक्षा कवच? कॅन्सरविरोधातील लस अंतिम टप्प्यात, कोणाला मिळणार लस?

Cancer Vaccine India: कॅन्सरमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठीची लस पुढील 5-6 महिन्यांत उपलब्ध होण्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भरत मोहोळकर, प्रतिनिधी

कॅन्सर कॅन्सरचं नाव काढलं तरी अनेकांना धडकी भरते. कारण कॅन्सरमुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतोय. याच कॅन्सरवर लस येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कॅन्सरवरची लस कधी मिळणार? आणि ही लस कुणाला दिली जाणार? हे जाणून घेऊया.

कॅन्सरचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण कॅन्सर दरवर्षी लाखो लोकांना विळखा घालतोय. ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, ओरल कॅन्सरमुळे हजारो महिलांना जीव गमवावा लागतोय. कॅन्सरमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठीची लस पुढील 5-6 महिन्यांत उपलब्ध होण्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं की, ही लस महिलांमध्ये होणाऱ्या सर्वात सामान्य प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण देणार आहे. या लसीवरील संशोधन जवळजवळ पूर्ण झालं असून त्याच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत.

देशात कॅन्सरमुळे महिलांच्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे 9 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. सरकारी आकडेवारीनुसार, महिलांना कोणत्या प्रकारचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे?

महिलांना कॅन्सरचा विळखा

  • ब्रेस्ट कॅन्सर- 26.6 टक्के

  • गर्भाशयाचा कॅन्सर- 17.7 टक्के

  • अंडाशयाचा कॅन्सर- 6.6 टक्के

  • मुखाचा कर्करोग- 5 टक्के

  • आतड्याचा कर्करोग- 3.7 टक्के

  • इतर- 40.5 टक्के

जर सर्व काही सुरळीत राहिलं तर ही लस पुढील ५-६ महिन्यांत उपलब्ध होऊ शकणार आहे. ही लस ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाणार आहे. जेणेकरून भविष्यात कॅन्सरपासून महिला सुरक्षित राहू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT