Cancer Risk google
लाईफस्टाईल

Cancer Risk: कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कोणत्या रुग्णांना जास्त असतो? डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

Cancer Recurrence: कॅन्सर एकदा बरा झाली की पुन्हा होत नाही हा गैरसमज आहे. डॉक्टरांनी याबाबत महत्वाची सांगितली आहे. तसेच यामध्ये तुम्ही लाइफस्टाइलमध्ये बदल करणं गरजेचं आहे.

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कोणत्याही वयाच्या टप्प्यात गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. चुकीच्या सवयींमुळे कधी कोणता आजार होईल? हे कळणं फार कठीण होतं. बऱ्याच जणांना वाटतं की, एकदा झालेले आजार पुन्हा होत नाही. पण हे कॅन्सरच्या रुग्णांबाबत किंवा आजाराबाबत बोलणं चुकीचं ठरु शकतं.

डॉक्टरांनी अनेकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये अनेकांना वाटतं की, कॅन्सरचे उपचार एकदा पूर्ण झाले की पुन्हा कॅन्सर होत नाही. पण डॉक्टरांचं याविषयीचं मत वेगळं आहे.

कॅन्सरवर एकदा उपचार केल्यानंतर अनेक जण बिनधास्त होतात. त्यांना पुन्हा आपल्याला याची लागण होणार नाही याची खात्री पटते. पण तज्ज्ञांच्या मते, उपचार पूर्ण झाला म्हणजे धोका संपला असं नाही. काही लोकांमध्ये पुन्हा वेगळ्या प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढू शकते.

अमेरिकेतील वर्जीनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याची माहिती दिली आहे. त्यामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना पुन्हा कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोणाला जास्त धोका?

संशोधनानुसार, पहिल्यांदा कॅन्सर झाल्यावर रुग्णाचं वय जितकं जास्त, तितका पुन्हा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. यामध्ये १९३५ ते १९४५ दरम्यान जन्मलेल्या लोकांमध्ये हा धोका जास्त असल्याचं समोर आलं. यामागे त्या काळातले तंबाखूचे जास्त प्रमाणात सेवन हे मोठं कारण असल्याचं संशोधकांनी सांगितलं.

महिला की पुरुषांना जास्त धोका?

तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमध्ये हा धोका महिलांपेक्षा जास्त असतो. वय वाढत गेलं की पुरुषांमध्ये दुसऱ्या कॅन्सरची शक्यताही झपाट्याने वाढत जाते. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, मुत्राशय आणि मेलेनोमा कॅन्सरमधून बरे झालेल्यांमध्ये पुन्हा कॅन्सरचा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्लानुसार लाइफस्टाइलमध्ये बदल करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT