Where is My Master ?
Where is My Master ? Saam Tv
लाईफस्टाईल

1880s Optical Illusion : तुम्ही २० सेकंदात बेअर्स मास्टर शोधू शकता का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : १८८० साली एक ऑप्टिकल इल्युजन(Optical Illusion) सादर करण्यात आलं होत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा रेखाचित्राची किंवा लोकांची मनाला संभ्रमित करणारी, खोलवर मोहक वाटणारी, आकार बदलणारी प्रतिमा किंवा बौद्धिक क्षमता समजून घेण्याच्या पद्धतीला आव्हान देणारी प्रतिमा. भौतिक, शारीरिक आणि संज्ञानात्मक भ्रम यांसारखे अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन आहेत. हे ऑप्टिकल इल्युजन मनोविश्लेषणाच्या क्षेत्राचा एक महत्वाचा भाग आहेत कारण हे ऑप्टिकल इल्युजन आपल्याला गोष्टी कशा समजतात यावर अवलंबून असतात. सामान्य मानवी मेंदू प्रत्येक कोनातून भिन्न धारणा बनवून वस्तू किंवा प्रतिमा वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. असेच एक ऑप्टिकल इल्युजन १८८० च्या दशकातील आहे ज्यामध्ये अस्वलाच्या चित्रामध्ये लपलेल्या माणसाचा चेहरा पाहिला जाऊ शकतो.

वरील चित्र १८८० च्या दशकात 'वेअर इज माय मास्टर?'(Where is my master?) या नावाने प्रसिद्ध होते. हे चित्र खास लहान मुलांसाठी डिझाइन करण्यात आले होते. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये अस्वलाचे चित्र दाखवले आहे. ज्यामध्ये माणसाचा चेहरा लपलेला आहे. तर, या ऑप्टिकल इल्युजनचा अवघड भाग म्हणजे या चित्रातून माणसाचा चेहरा शोधणे. या चित्राने हजारो प्रौढांना विचार करण्यास भाग पडले कारण अस्वलाच्या केसांमध्ये लपवलेला चेहरा शोधणे खरोखरच खूप कठीण आहे.

तुम्ही २० सेकंदात अस्वलाचे मास्टर शोधू शकता का?

या ऑप्टिकल इल्युजनकडे बारकाईने पहा आणि अस्वलाच्या चित्रामध्ये लपलेल्या माणसाचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करा. माणसाचा चेहरा शोधणे खूप अवघड वाटू शकते, परंतु जर तुम्ही तुमचे डोके थोडेसे उजवीकडे वाकवले तर तुम्हाला थोडी मदत होऊ शकते. अस्वलाचा मालक अस्वलाच्या डाव्या कानाच्या अगदी खाली अस्वलाच्या मानेकडे तोंड करून असल्याचे दिसते.

आपले मेंदू कसे कार्य करते हे समजण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन नेहमी महत्वाची ठरते. रंग, प्रकाश आणि विशिष्ट संयोजन आपल्या मेंदूला असे ऑप्टिकल इल्युजन समजण्यात बाधा निर्माण करत असतात. तर नक्की बघा तुम्हाला या ऑप्टिकल इल्युजनमध्ये लपलेला मनुष्याचा चेहरा दिसतोय का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT