Waterproof Cover For Two Weeler Saam Tv
लाईफस्टाईल

Waterproof Cover For Two Weeler : काय सांगता ! पावसात घेता येईल बाईक राईडचा आनंद ? या वॉटरप्रूफ कव्हरने होईल तुमचे संरक्षण, आजच खरेदी करा

Waterproof Cover : पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात दुचाकी चालवणाऱ्यांना प्रवासात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bike Rain Cove : पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात दुचाकी चालवणाऱ्यांना प्रवासात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. पावसामुळे अनेकवेळा ऑफिसला जाण्यास उशीर होतो, त्यामुळे अनेक वेळा घराबाहेर पडण्याचा प्लॅन बदलावा लागतो.

बरेच लोक रेनकोट घालून बाईक-स्कूटर चालवतात, परंतु हे देखील त्यांना मुसळधार पावसापासून संरक्षण (Protection) करण्यासाठी फारसे प्रभावी ठरत नाही. अशावेळी तुम्ही रेन आणि सनरूफ कव्हर वापरू शकता जे बाईक आणि स्कूटरवर सहज बसवता येते.

हे कव्हर तुम्हाला पावसापासून तसेच उन्हापासून बचावते आणि त्याची किंमतही जास्त नाही. ते कव्हर असे आहे की ते तुम्हाला जास्त त्रास (Trouble) होणार नाही आणि गाडी चालवताना काहीही अडचण येणार नाही.

रेन कव्हर पावसापासून संरक्षण करते

हे रेन कव्हर कोणत्याही बाइक किंवा स्कूटरवर सहज बसवता येते. हे कव्हर पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. हे लावल्यानंतर पावसात डोकं भिजणार नाही, पण त्यात पायाचा भाग वाचवणं अवघड असते. ते दुचाकीच्या पुढच्या भागातून बसवावे आणि मागील भागात व्यापते. जर कोणी बाईकवर तुमच्या मागे बसल्यास कव्हरमुळे ओले होण्यापासून देखील वाचवते.

बसवणे सोपे आहे

या कव्हरची पुढील आणि मागील बाजू पारदर्शक (Transparent) पॉलिथिनने बनलेली आहे तर वॉटरप्रूफिंगसाठी पॅराशूट कापड वापरला जातो. हलक्या पावसात, हे आवरण तुमचे ओले होण्यापासून संरक्षण करेल, परंतु जर जोरदार पाऊस पडला तर तुमचे पाय त्यात ओले होतील.

ते बाइक किंवा स्कूटरमध्ये बसवणे खूप सोपे आहे. ते बाईक लावण्यासाठी त्याच्या किटमध्ये मार्गदर्शक देखील येतो. गरज नसतानाही ते सहज काढता येते. तुम्हाला बाजारात 800 ते 1000 रुपयांना पाऊस आणि सनरूफ कव्हर सहज मिळेल. तुम्ही ते ऑनलाइनही खरेदी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती युगेंद्र पवार आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT