Married Daughter's right on Father’s property
Married Daughter's right on Father’s property Saam TV
लाईफस्टाईल

Property Rights of Daughter: विवाहित मुली वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकतात का?, जाणून घ्या काय आहे कायदा

Satish Kengar

Married Daughter's right on Father’s property: भारतात साधारणपणे वडिलांची मालमत्ता ही मुलांनाच मिळते. देशातील एक मोठा वर्ग आजही ही परंपरा पाळत आहे. आई-वडीलही त्यांची संपत्ती फक्त मुलांमध्येच विभाजित करतात. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आजही बहुतेक पालक आपल्या मुलींना मुलांपेक्षा कमी समजतात.

यातच अनेक लोकांना असे वाटते की मुलगी लग्नानंतर दुसऱ्या घरात जाते आणि लग्नानंतर सासरच्या संपत्तीत तिचा वाटा होतो. मात्र यामागेही अनेक नियम आणि कायदे आहेत. विवाहित मुलगी तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकते का? आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

Married Daughter's right on Father’s property: विवाहित मुली देखील वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकतात

हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा 2005 नुसार (Hindu Succession (Amendment) Act, 2005) मुलांप्रमाणेच मुलीलाही वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क आहे. मग त्यांचे लग्न झाले असेल किंवा नाही. त्यामुळे विवाहित मुलीही वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतात.

मात्र वडिलांनी मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रात मुलीचा समावेश केला नसेल तर मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. (Latest News)

Hindu Succession Act: मुलींना जन्मताच वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क मिळतो

सर्वोच्च न्यायालयाच्या (SUPREME COURT) म्हणण्यानुसार, हिंदू धर्मातील मुलीचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर जन्माच्या क्षणापासून समान हक्क असतो, मग तिचे वडील हयात असोत किंवा नसोत. हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा 2005 चे नियम हिंदू धर्मातील महिलांना तसेच बौद्ध, शीख, जैन, आर्य समाज आणि ब्राह्मो समाजातील मुलींना लागू होतात.

दरम्यान, हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा 2005 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व उच्च न्यायालयांना अशा प्रकरणांचा 6 महिन्यांत निपटारा करण्याचे निर्देश दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT