सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला कमी वयातच काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. आत्तापर्यंत तुम्ही पंचविशीत ब्लड प्रेशरचा त्रास होतो हे ऐकलं असेल पण पुढील माहिती वाचून तुम्हाला धक्काच बसू शकतो. कारण ब्लड प्रेशरच्या धोका निर्माण होण्यामागे अनेक आजारांचाही त्यात समावेश असू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा पालक मुलांचे हेल्थ चेकअप करतात, तेव्हा त्यांना BP च्या समस्या आढळतात. पण या समस्येला जर दुर्लक्ष केलं तर मुलांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. तसेच त्यांना ह्रदयाशी संबंधित आजार, किडनीच्या समस्या, मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका सुद्धा वाढतो. त्यामुळे तुम्ही याची लक्षणे वेळीच ओळखणं गरजेचं आहे.
लहान मुलांना ब्लड प्रेशरचा धोका आहे हे कधी समजतं?
तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला लहान मुलांमध्ये ब्लड प्रेशरचे कोणतेही लक्षण दिसत नाही. त्यामुळे याला सायलेंट किलर सुद्धा म्हटलं जातं. मुलांना याने जास्त त्रासही होत नाही. पण जेव्हा रुटीन चेकअप केलं तेव्हा त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असल्याचं आढळलं. पण यासोबत काही लक्षणं डॉक्टरांच्या निदर्शनास आली. त्यामध्ये ब्लड प्रेशर वाढल्यावर मुलांना डोकेदुखीचा त्रास, चक्कर येणे, धुसर दिसणे, जास्त थकवा जाणवण्याच्या समस्या वाढतात. त्यामुळे पालकांना अशा समस्या मुलांमध्ये जाणवत असतील तर दुर्लक्ष न करता हेल्थ चेकअप केलं पाहिजे.
तसेच मुलांच्या वजनावर सुद्दा लक्ष ठेवलं पाहिजे. तर कुटुंबातील व्यक्तींना डायबेटीज, ब्लड प्रेशर किंवा कोणतेही गंभीर आजार असतील तर मुलांची वेळोवेळी तपासणी करून त्यावर वेळीच उपचार केले पाहिजेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.