Cholesterol Detox Tips saam tv
लाईफस्टाईल

Cholesterol Detox Tips: रक्तातील चरबी मेणासारखी वितळवेल आल्याचं पाणी? कसं बनवाल हे पाणी, आताच नोट करा

Ginger water for cholesterol: आल्याचं पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते का? जिंजरॉलचे फायदे, आल्याचं पाणी तयार करण्याची सोपी पद्धत आणि पचन, मळमळ, वजन नियंत्रणासाठी त्याचा उपयोग जाणून घ्या. हाय कोलेस्ट्रॉल असल्यास योग्य उपचार आणि आहारही महत्त्वाचा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढतेय. यामध्ये हाय कोलेस्ट्रॉलची समस्याही मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. यासाठी योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची ठरते. यासोबतच काही घरगुती पदार्थांचाही आहारात समावेश केला जातो. असाच एक पदार्थ म्हणजे आलं. आल्यापासून तयार केलेलं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. सकाळी रिकाम्या पोटी आल्याचं पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

आल्याचं पाणी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर?

आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा नैसर्गिक घटक असतो. या घटकामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होऊ शकते. तसंच रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही आलं उपयोगी ठरू शकतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांसाठी आल्याचं पाणी फायदेशीर ठरू शकते.

आल्याचं पाणी कसं तयार करावं?

आल्याचं पाणी बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज नाही. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे पाणी तयार करता येतं.

सर्वप्रथम आल्याचा एक इंच लांबीचा तुकडा घ्या. त्यानंतर त्याची साल काढून आलं स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात आल्याचा तुकडा टाका. आता हे पाणी उकळत ठेवा. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पाण्याचं प्रमाण अर्धे होईपर्यंत ते उकळू द्या. त्यानंतर पाणी गाळून कपात घ्या. पाणी थोडे थंड झाल्यावर प्या.

आल्याचे पाणी पिण्याचे इतर फायदे

  • आल्याचं पाणी केवळ कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठीच नाही तर आरोग्याच्या इतर समस्यांमध्येही फायदेशीर ठरू शकतं

  • पचन सुधारण्यास मदत- आल्याचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होऊ शकतं.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते- आल्यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

  • सकाळच्या मळमळीपासून आराम- सकाळी मळमळ किंवा उलट्या होण्याचा त्रास कमी करण्यासाठी आलं उपयोगी ठरू शकते.

  • वजन कमी करण्यासाठी फायदेशीर- वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही आल्याचं पाणी मदत करू शकतं.

  • अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत- आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराचं नुकसान करणाऱ्या घटकांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी मोठी बातमी! B2B व्यवहारासाठी द्यावे लागणार फक्त ५ रुपये शुल्क

Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घरावर बुलडोझर, पोलिस बंदोबस्तात पालिकेची कारवाई; पाहा VIDEO

Mrunal Thakur : बोल्डनेसचा कहर! मृणालच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची उडवली झोप

Maharashtra News Live Update: राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय

Eating 3 eggs every day: रोज 3 अंडी खाल्ल्याने काय होतं? डॉक्टरांनी सांगितलं शरीरात काय बदल होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT