Blood Pressure Impact saam tv
लाईफस्टाईल

Blood Pressure Impact: नॉर्मल ब्लड प्रेशर असूनही येऊ शकतो हार्ट अटॅक? धडकी भरवणारा संशोधनाचा दावा समोर!

Blood Pressure Effects on Heart: नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक संशोधनानुसार तुमचा रक्तदाब अगदी सामान्य किंवा नियंत्रणात असूनही तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कायम राहतो.

Surabhi Jayashree Jagdish

आपण आपल्या हृदयाची फार काळजी घेतो. मुळात हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. हृदय हे रक्त पंप करण्याचं काम करतं. मात्र नुकतंच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, हृदय तुमच्या ब्लड प्रेशरच्या जुनी माहिती देखील लक्षात ठेवतं.

संशोधनात सांगण्यात आलंय की, तुमच्या ब्लड प्रेशरचा जो पॅटर्न तयार होतो त्याचा परिणाम थेट 70 वर्षांच्या वयात हृदयाच्या आरोग्यावर दिसतो. जर मध्यम वयात तुमचं ब्लड प्रेशर थोडं जरी जास्त असेल तरी त्याचा परिणाम वृद्धावस्थेत हृदयाच्या कार्यावर स्पष्टपणे दिसतो.

संशोधनातून काय समोर आलं?

हा स्टडी ब्रिटिश हार्ट फाउंडेशन (BHF) ने फंड केला असून Circulation Cardiovascular Imaging जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये 450 हून अधिक ब्रिटिश नागरिकांची अनेक दशकांपर्यंत माहिती ट्रॅक करण्यात आली. निष्कर्षांनुसार, ज्यांचं ब्लड प्रेशर सतत थोडं वाढलेला होतं जरी तो ‘नॉर्मल’ रेंजमध्ये असलं तरी त्यांचा हृदयापर्यंत रक्तप्रवाह 70 वर्षांच्या वयात 6 ते 12 टक्क्यांनी कमी झाला.

या अभ्यासाचे वरिष्ठ संशोधक प्रा. निश चतुर्वेदी यांनी सांगितलं की, तुमचं हृदय तुमच्या जुन्या गोष्टींची माहिती ठेवतं. दीर्घकाळ थोडं वाढलेलं ब्लड प्रेशर देखील हळूहळू पण खोलवर परिणाम करू शकतं.

आतापर्यंत आपण ब्लड प्रेशरला एका मर्यादेसंबंधीची समस्या मानत होतो. म्हणजे 140/90 पेक्षा जास्त ब्लड प्रेशर झालं तर झाला तर धोका आणि कमी राहिला तर सुरक्षित. पण या संशोधनाने दाखवून दिलंय की, खरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या वेळची रीडिंग नाही तर वर्षानुवर्षे तुमचं ब्लड प्रेशर कसं बदलतंय हे आहे.

ब्लड प्रेशरच्या ट्रेंड्सकडे द्या लक्ष

याचा अर्थ असा की, 30 किंवा 40 वर्षांच्या वयात शरीर जरी फीट दिसलं तरी सतत थोडं वाढलेलं प्रेशर पुढील दशकांत हृदयाच्या धमन्या संकुचित करू शकतो. म्हणूनच डॉक्टर आता एकल रीडिंगपेक्षा ब्लड प्रेशरच्या ट्रेंड्सकडे लक्ष देण्याचा सल्ला देतायत.

जीवनशैलीमुळे काय परिणाम होतात?

जर तुमची जीवनशैली चुकीची असेल तर तुमच्या 30 व्या वर्षीच तुम्ही 70 व्या वर्षाच्या व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगता. या काळात उशिरापर्यंत जागं राहणं, जास्त मीठ असलेलं अन्न खाणं, कॅफीन आणि ताण यांसारख्या सवयी हळूहळू परिणाम दाखवू लागतात. 40 व्या वर्षी काम आणि जबाबदाऱ्या वाढतात आणि यामुळे हार्मोन्समध्येही बदल होतो. त्यामुळे जीवनशैलीत योग्य ते बदल करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

440 व्होल्टचा धक्का! Bigg Boss 19च्या 'या' सदस्याला मिळाले 'तिकीट टू फिनाले'

हृदयद्रावक! ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचा मृत्यू, प्रचाराच्या रणधुमाळीत आला हार्ट अटॅक

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, तब्येतीची विचारपूस करणार

NHM Bharti: आरोग्य विभागात नोकरीची संधी; १९४७ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

भाजपमध्ये भूकंप! ५० बड्या नेत्यांचा सामूहिक राजीनामे, कारण काय? नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT