Holi 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2023 : होळीच्या दिवशी 'या' गोष्टींची करा खरेदी, आयुष्यभर भासणार नाही पैशांची कमतरता !

Holi Festival 2023 : पंचांगानुसार होलिका दहन हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Holi Shubh Muhurta : आज सर्वत्र होळीची धामधूम असेल. तर दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाणार आहे. पंचांगानुसार होलिका दहन हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.

होलिका दहनाचा दिवस खूप महत्त्वाचा असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये या दिवशी काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रास आणि रोगांपासून मुक्ती मिळते.

यासोबतच सुख-समृद्धीही मिळू शकते. यापैकी एक उपाय म्हणजे होलिका दहनाच्या दिवशी चांदीशी (Silver) संबंधित काही वस्तू खरेदी करून घरी आणणे. जाणून घेऊया त्याविषयी

1. चांदीचे नाणे

ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की, होळीच्या दिवशी चांदीचे नाणे आणि एक छोटी पेटी खरेदी करा. ते पिवळ्या रंगाच्या कपड्यात हळदीने बांधून माता लक्ष्मीजवळ ठेवा. होलिका दहनाच्या रात्री चांदीच्या डब्यात हे भरून आपल्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा, असे मानले जाते की असे केल्याने माणसाला कधीही पैशाची (Money) कमतरता भासत नाही.

2. चांदीची अंगठी

होलिका दहनाच्या दिवशी चांदीची अंगठी खरेदी करून तिची विधिवत पूजा करावी. यानंतर ते बोटात घाला. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीचे नशीब नेहमी त्याच्यावर अनुकूल असते.

3. चांदीची भांडी

होळीच्या दिवशी विवाहित महिलांनी (Women) चांदीची भांडी खरेदी करणे खूप शुभ असते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. होळीच्या दिवशी, चांदीची खरेदी करा आणि घरी आणा, दुधाने धुवा आणि विवाहित स्त्रीला द्या किंवा स्वतः परिधान करा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT