Business Ideas Saam Tv
लाईफस्टाईल

Business Ideas : कमी गुंतवणूकीत मिळेल अधिक पैसा, बिझनेस करण्यासाठी आहे हा बेस्ट पर्याय

Computer Repairing Center : मोबाईल-लॅपटॉपची बाजारपेठ आणि व्यवसाय सातत्याने वाढत आहेत.

Shraddha Thik

Business Ideas :

संगणक आणि लॅपटॉपने आता जवळपास प्रत्येक घरात आहेत. मोबाईल-लॅपटॉपची बाजारपेठ आणि व्यवसाय सातत्याने वाढत आहेत. आता त्यांची संख्या वाढत असल्याने दुरुस्ती करण्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळे आता लॅपटॉप-कॉम्प्युटर दुरूस्तीचे काम हे बिझनेस बनले आहे. तुम्हालाही काही बिझनेस (Business) करायचा असेल तर तुम्हीही ही कामे सुरू करू शकता.

Computer Repairing Centerमध्ये हार्डवेअरपासून सॉफ्टवेअरपर्यंतचे काम केले जाते. संगणक किंवा लॅपटॉप रिपेअरींग सेंटर सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे संगणकाशी संबंधित हार्डवेअरपासून ते सॉफ्टवेअरपर्यंत सर्व प्रकारची माहिती असणे आवश्यक आहे. हे काम (Work) सुरू करण्यासाठी संगणक प्रशिक्षण केंद्रात जाऊन प्रशिक्षण घ्यावे आणि त्यानंतर हा व्यवसाय सुरू करावा.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुठे शिकायचे?

आजच्या काळात कोणत्याही प्रकारच्या कामाची माहिती मिळवण्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही. तुमच्याकडे फक्त इंटरनेट (Internet) आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक ऑनलाइन पद्धतींद्वारे संगणकाचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेऊ शकता. तुम्ही CNet.com आणि ZDN.com सारख्या ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या वेबसाइटचीही मदत घेऊ शकता. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यूट्यूब किंवा कोणत्याही संगणक प्रशिक्षण केंद्रावर जाऊन त्याचे प्रशिक्षण घेऊ शकता.

दुकान कुठे उघडायचे?

Computer Repairing Center अशा ठिकाणी उघडावे लागेल जिथे लोक सहज पोहोचू शकतील आणि तेथे आधीच संगणक दुरुस्ती केंद्रे नाहीत. संगणक दुरुस्ती केंद्रात सर्व प्रकारची उपकरणे ठेवणे आवश्यक आहे. आपण प्रथम काही प्राथमिक साधने ठेवली पाहिजेत जी खालीलप्रमाणे आहेत. मदर बोर्ड, सीपीयू (प्रोसेसर), रॅम (मेमरी), हार्ड ड्राइव्ह (आयडीई आणि एसएएस), व्हिडिओ कार्ड, साउंड कार्ड आणि नेटवर्क कार्ड इ.

कमाई किती असेल?

Computer Repairing Center उघडण्यासाठी, तुम्हाला सुमारे 5 लाख रुपयांची गुंतवणूक सुरू करावी लागेल. या रकमेतून तुम्हाला तुमच्या दुकानासाठी आवश्यक उपकरणे आणि फर्निचर इत्यादी मिळतील. एकदा काम सुरू झाले की, तुम्ही तुमचा व्यवसाय नंतर वाढवू शकता. जर तुमचे काम चांगले झाले तर तुम्ही एका दिवसात 3000 रुपये सहज कमवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT