Business Idea Saam Tv
लाईफस्टाईल

Business Idea : फक्त 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून करा हा बिझनेस सुरू, महिन्यात लखपती व्हाल

Business Idea Tips : ज्यामध्ये भरपूर कमाई आणि कमी भांडवल असेल तर आम्ही येथे बिझनेस आयडीया आणली आहे.

Shraddha Thik

Business Tips :

जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल. ज्यामध्ये भरपूर कमाई आणि कमी भांडवल असेल तर आम्ही येथे बिझनेस आयडीया आणली आहे. आज तुम्हाला 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून करून बिझनेस (Business) सुरू करण्याची आयडिया देणार आहोत. हा व्यवसाय चहाच्यापत्तीचा आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दैनंदिन जीवनात चहाचे देखील महत्त्वाचे स्थान आहे. आज देशातील प्रत्येक वर्ग चहाचा शौकीन आहे. बहुतेक घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने होते. अशा स्थितीत या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकजण हे उत्पादन वापरतो.

देशाच्या अनेक भागात चहाच्या पानांची लागवड केली जाते. आसाम आणि दार्जिलिंगमधील चहाची पाने ही सर्वोत्तम चहापत्तीने मानली जातात. त्याची मागणी भारतातच (India) नाही तर परदेशातही आहे. तुम्हाला चहापत्तीचा व्यवसाय करायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

चहापत्तीचा व्यवसाय कसा करायचा?

चहापत्तीचा व्यवसाय अनेक प्रकारे करता येतो. तुम्ही बाजारात (Market) सैल चहापत्ती विकू शकता किंवा तुम्ही चहापत्तीचा किरकोळ आणि घाऊक दरात व्यापार देखील करू शकता. याशिवाय, अनेक मोठ्या कंपन्या देखील आहेत, ज्या आपला सैल चहापत्ती विकण्यासाठी फ्रँचायझी चालवतात.

ही फ्रेंचाइजी अतिशय कमी बजेटमध्ये उपलब्ध असते. त्यानंतर तुम्हाला विक्रीवर चांगले कमिशन मिळते. याशिवाय एक पर्याय म्हणजे डोअर टू डोअर सेलिंग तुम्ही घरोघरी सैल चहापत्ती उत्तम पॅक करून वाजवी दरात विकू शकता. लोकांना तुमचा चहा आवडेल कारण तुम्ही तो स्वस्त दरात विकता.

तुम्ही दर महिन्याला कमाई कराल

चहापत्तीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आसाम आणि दार्जिलिंगचा चांगला मजबूत चहा 140 ते 180 रुपये प्रति किलो दराने घाऊक दरात सहज उपलब्ध आहे. जे तुम्ही बाजारात 200 ते 400 रुपये किलो दराने विकू शकता.

फक्त 5000 रुपयांपासून सुरू करून, तुम्ही या व्यवसायातून दरमहा 20,000 रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. जर तुम्हाला हा ब्रँड बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची कंपनी रजिस्टर करावी लागेल. याशिवाय चांगल्या दर्जाचे पॅकेजिंगही करावे लागणार आहे. यानंतर तुम्ही चांगले मार्केटिंग करून मोठी कमाई करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

Maharashtra Politics : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहणार की जाणार? साडेसाती टाळण्यासाठी कृषीमंत्री शनिचरणी?

Maharashtra Live News Update: पावसाळ्यात बीडमधील रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यात "होडी चलाव" आंदोलन

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

SCROLL FOR NEXT