Health Tips, Child Care tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : मुलांच्या छातीत सतत जळजळ होतेय ? कमी वयात अॅसिडिटीचा त्रास तर नाही ना ? हे घरगुती उपाय करुन पहा

सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी व इतर आजार उद्भवू शकतात.

कोमल दामुद्रे

Health Tips : वाढत्या वयात मुलांना अधिक पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे आहे. मुलांच्या आरोग्यबरोबरच त्यांच्या वाढीसाठी जंक फूड हे हानिकारक असतात. परंतु, मुलांना हे पदार्थ खाण्याची सवय लागलेली असते.

बदललेली जीवनशैली, अनारोग्यदायी पदार्थ, सतत बाहेरचे खाणे यामुळे मुलांच्या आरोग्यावर (Health) त्याचा परिणाम होतो. सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी व इतर आजार उद्भवू शकतात.

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या की, त्यांना बाहेरचे पदार्थ खाण्याची चव लागते त्यामुळे ते घरचे अन्न खात नाही व त्यामुळे त्यांना इतर त्रास देखील सुरु होतो.

हल्ली मुलांच्या पोटात गॅस तयार होण्याची समस्या सर्वसामान्य आहे. पोटात गॅसची आणि अपचनाची समस्या लहान मुलांमध्ये देखील दिसून येते. पोटात गॅस होत असेल तर अशा परिस्थितीत पालकांना सल्ला दिला जातो की, काही घरगुती उपाय केल्यास मुलांमधील गॅसच्या समस्येवर मात करता येईल.

मुलांना गॅसच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय -

१. मुलांमधील गॅसच्या समस्येवर मात करण्यासाठी ओवा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. अशा स्थितीत एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घालून उकळा. पाणी अर्धा कप राहिले की, ते गाळून घ्या आणि मुलांना कोमट करुन ते पिण्यास द्या. असे केल्याने मुलांमधील गॅसच्या समस्येवर मात करता येते. याशिवाय त्याचा चहा बनवून मुलांना प्यायला दिल्याने त्याचाही अधिक फायदा होईल.

२. लहान मुलांच्या आहारात आल्याचा समावेश करा. मुलांमध्ये गॅसची समस्याही आल्याच्या रसाने दूर केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही मुलांना आल्याचा रस देखील देऊ शकता. याशिवाय आल्याचा चहाही मुलांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. अद्रकामुळे मुलांची पचनक्रिया सुरळीत राहतेच पण जर अद्रकाचे सेवन मर्यादित प्रमाणात केले गेले तर मुले (Child) सर्दी आणि खोकल्यापासूनही दूर राहू शकतात.

३. लिंबाचा रस आणि काळे मीठ या दोन्हींचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. अशा परिस्थितीत एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळा. आणि तयार मिश्रणाचे सेवन करा. असे केल्याने मुलांना अन्न पचण्यास मदत मिळू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! 'या' ७ चुका टाळा, नाहीतर रोजचा १ कप चहा पिणेही होईल बंद

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

SCROLL FOR NEXT