Honeymoon Trip Saam tv
लाईफस्टाईल

बजेटमध्ये प्लान करा Honeymoon Trip! १० हजार रुपयांत फिरा भारतातील ही सुंदर नयनरम्य पर्यटनस्थळे

Budget Honeymoon Trip : लग्नानंतर कपल्सला बाहेर फिरण्याची ऑफिशियल परवानगी मिळते. लग्नानंतर हनिमून ट्रिपला जाण्याची क्रेझ तरुणांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. लग्नानंतरचा हनिमून हा प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास असतो.

कोमल दामुद्रे

Honeymoon Travel Trip :

लग्नानंतर कपल्सला बाहेर फिरण्याची ऑफिशियल परवानगी मिळते. लग्नानंतर हनिमून ट्रिपला जाण्याची क्रेझ तरुणांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. लग्नानंतरचा हनिमून हा प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास असतो.

हनिमून परदेशात जाण्याची क्रेझ खूप वाढली आहे. पण परदेशवारी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते. पण जर तुम्हाला स्वस्तात मस्त ट्रिप प्लान करु शकता. कमी खर्चात हनिमून डेस्टिनेशन शोधत असाल तर भारतातील (India) ही ठिकाणे बेस्ट ठरतील.

1. माउंट अबू

१० हजार रुपयांत तुम्ही माउंट अबूला भेट देऊ शकता. या ठिकाणी सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रवासाचा खर्च आणि राहाण्याचा खर्च हा जास्त नसतो. येते तुम्हाला १००० ते १५०० रुपयांपर्यंत हॉटेल्स सहज मिळतील. याशिवाय प्रवासासाठी तुम्हाला एक दिवसासाठी ५०० रुपये (Price) भाड्याने स्कूटर मिळते. तसेच ज्या ठिकाणाहून प्रवास कराल तिथे तुम्हाला फक्त ट्रेननेच यावे लागेल. स्लीपर कोचमध्ये तुम्हाला ५०० रुपयांपर्यत तिकीट मिळेल. दोन लोकांचा प्रवास खर्च हा फक्त २००० रुपये होईल. हॉटेलमध्ये २ दिवस राहाण्याचा खर्च २५०० रुपये असेल.

2. किशनगड

बजेट कमी असेल आणि तुम्हाला बर्फाच्छादित प्रदेशात फिरायचे (Travel) असेल तर तुम्ही राजस्थानमधील किशनगडला जाण्याचा प्लान करु शकता. या ठिकाणी तुम्ही एकाच वेळी दोन ठिकाणांना भेट देऊ शकता. पुष्कर हे किशनगडपासून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे. येथे तुम्हाला पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या डंपिंग यार्डला भेट देता येऊ शकते. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. येथे १००० रुपयांमध्ये हॉटेल सहज मिळू शकतात. तर ५०० ते ६०० रुपयाने भाड्याने स्कूटरही मिळेल.

3. जयपूर

१० हजार रुपयांत तुम्हाला फिरायचे असेल तर तुम्ही जोडीदारासोबत जयपूरला जाऊ शकता. येथे जाण्यासाठी तुम्हाला अनेक वाहने सहज मिळतील. ज्याचे तिकीट ३०० ते ४०० रुपये असेल. स्कूटरीवरुन तुम्हाला संपूर्ण जयपूर शहर फिरता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, 34 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, ५ जणांना अटक

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT