BSNL  Saam TV
लाईफस्टाईल

स्वस्त आणि मस्त; बीएसएनएल कंपनीचा १९ रुपयांचा बेस्ट प्लॅन, पाहा डिटेल्स

अनेकांना इंटरनेट वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळे देशभरातील मोठं-मोठ्या टेलीकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन ग्राहकांसमोर आणत असतात. बीएसएनएल देखील त्यांच्या ग्राहकांवर गरजांवर लक्ष ठेवून असते

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : आधुनिकीकरणामुळे देशात इंटरनेटचा (Internet) वापर खासगी कामापासून ते सरकारी कार्यलयातही वाढला आहे. आजची नवी पिढी त्यांचा अधिक वेळ इंटरनेट वापरण्यावर खर्च करते. त्यामुळे सध्या इंटरनेट डाटाची गरज खूप वाढली आहे. त्यात कधी मोबाईल वापरताना अचानक इंटरनेट डाटा संपल्यावर काहीच कळत नाही की, आता काय करावं. आजकाल घरी किंवा बाहेर गेलो तरी इंटरनेट वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळे देशभरातील मोठं-मोठ्या टेलीकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन ग्राहकांसमोर आणत असतात. बीएसएनएल देखील त्यांच्या ग्राहकांवर गरजांवर लक्ष ठेवून असते. नुकताच बीएसएनएल (BSNL) एक नवा प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. ( BSNL Data Plans recharge news )

बीएसएनएल कंपनीकडे ३० दिवसांचा वैधता असणारे अनेक प्लॅन आहेत. बीएसएनएल कंपनीकडे आता ९० जीबी डाटा असणारे इंटरनेट प्लॅन देखील उपलब्ध आहेत. तसेच बीएसएनएल कंपनीकडे ३० दिवसांची वैधता असणारे पाच रिचार्ज प्लॅन आहेत.

बीएसएनएल कंपनीचा १९ रुपयांचा प्लॅन

१९ रुपयांचा प्लॅन हा बीएसएनएल कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. तुम्हाला तुमचं सिमकार्ड हे अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा प्लॅन सर्वात किफायतशीर आहे. या प्लॅनमध्ये ३० दिवसांच्या वैधतेशिवाय तु्म्हाला

कोणत्याही सिमकार्डच्या नेटवर्कवर २० पैसे/मिनिटची सबसिडीचे कॉल (Call) दर मिळणार आहे. मात्र, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 'एसएमएस'ची सुविधा मिळणार नाही.

बीएसएनएल कंपनीचा १४७ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएल कंपनीचा १४७ रुपयांचा हा प्लॅन खिशाला परवडणारा आहे. या प्लॅनमध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर अलिमिटेड कॉलसोबत ३० वैधता असणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये १० जीबी इंटरनेट डाटा मिळणार आहे. या व्यतिरिक्त बीएसएनएल कंपनीच्या काही कॉलर ट्यून मोफत (Free) मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 'एसएमएस'ची सुविधेचा सामावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT