Breakfast idea for diabetics, how to control sugar level ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Breakfast idea for diabetics : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची आहे ? मधुमेहाने ग्रस्त आहात ? कोणते पदार्थ आहारात घ्यायला हवे जाणून घ्या

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ खा.

कोमल दामुद्रे

Breakfast idea for diabetics : मधुमेह हा आजार दीर्घकाळ चालणारा आजार आहे. हा आजार आनुवंशिक असतो किंवा आपल्या बदलेल्या आहारामुळे होतो. मधुमेह हे शरीर व अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपातंर करते. ज्याठिकाणी स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

हे देखील पहा -

मधुमेह असणाऱ्यांनी आहारात बदल करायला हवा. आपल्या आवडीच्या पदार्थांवर आणि पेयांवर मर्यादा आणणे. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे, ब्रोकोली, गाजर, हिरव्या भाज्या, मिरी आणि टोमॅटो यासारख्या स्टार्च नसलेल्या पदार्थांपासून ते संत्री, खरबूज, बेरी, सफरचंद, केळी आणि द्राक्षे यासारख्या फळांपर्यंत, हे पदार्थ तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत. आपला सकाळचा नाश्ता कसा असायला हवा ज्यामुळे आपले पोट भरलेले राहिल व आपण दिवसभर ताजेतवाणे राहू हे जाणून घेऊया

१. नाश्ता करणे हे दिवसभरातील सर्वात महत्त्व पूर्ण खाद्यपदार्थ मानले जाते. त्यात मधुमेह असलेला रुग्ण आपल्या घरात असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी त्यांच्या आहारात पौष्टिक आणि रुचकर पदार्थ असायला हवे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.

२. आपण त्याच्या आहारात ओट्सचा समावेश करु शकतो. यात फायबर्स व बीटा ग्लुटेन यांसारखे पदार्थ असतात. जे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्याचे काम करते. तसेच इतर आजारांपासून आपल्याला वाचवण्यास मदत करते. त्याच्या आहारात भाज्यांचा ओट्स पॅनकेकचा समावेश करु शकतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना यांचा फायदा होतो.

३. मधुमेह (Diabetes) असणाऱ्यांच्या आहारात आपण बाजरीच्या रोटीचा समावेश करु शकतो. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते. शरीरातील हाडे मजबूत होतात व रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

४. मूगाच्या डाळीत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे सर्दी आणि फ्लूची समस्या दूर राहण्यास मदत होते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पचण्यास हलके असते. त्यामुळे त्यांच्या आहारात आपण मूग डाळीच्या इडलीचा समावेश करु शकतो.

या निरोगी, तंतुमय पदार्थांचा आनंद घेण्याव्यतिरिक्त, आपण नियमितपणे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण देखील तपासायला हवे. तसेच धुम्रपान आणि अल्कोहोल पिणे यासारख्या हानिकारक सवयींपासून दूर राहा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवसेना उमेदवार विजय शिवातारेंकडून आचारसंहितेचा भंग

Shadashtak Yog: सूर्य-गुरुची अशुभ दृष्टीमुळे ओढावणार 'या' राशींवर संकट; नात्यात टोकाचे वाद होण्याची शक्यता

Bank Job: १५०० रिक्त जागा अन् ८५००० रुपये पगार; यूनियन बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Maharashtra Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार, ९१ पदाधिकाऱ्यांनी सोडली साध, भाजपचा प्रचार करणार!

Winter Breakfast Ideas : हिवाळ्यात तुमची सकाळ होईल गोड; १० मिनिटात बनवा टेस्टी अन् हेल्दी ब्रेकफास्ट

SCROLL FOR NEXT