Blood Sugar Control Tips  AI Image
लाईफस्टाईल

Blood Sugar:  शुगर कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा उपाय! रात्री खोलीत 'ही' एक गोष्ट , रक्तातील साखर राहील एकदम नॉर्मल

Blood Sugar Control Tips : डायबिटीज असलेल्या लोकांसाठी एअर प्युरिफायर ठरू शकतो फायदेशीर? संशोधनात बेडरूममधील स्वच्छ हवा आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणाबाबत महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत.

Alisha Khedekar

आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाकडे लक्ष देतो. मात्र, घरातील हवा किती स्वच्छ आहे, याचाही आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एका संशोधनातून ही महत्त्वाची बाब समोर आली आहे. रात्री झोपताना बेडरूममध्ये एअर प्युरिफायर किंवा एअर फिल्टरचा वापर केल्यास प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

या संशोधनात 150 हून अधिक प्री-डायबिटीज असलेल्या महिला आणि पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. संशोधकांनी या लोकांना दोन गटांत विभागले. एका गटाला बेडरूममध्ये हवा स्वच्छ करणारे फिल्टर देण्यात आले, तर दुसऱ्या गटाला केवळ दिसायला सारखे असलेले, पण हवा स्वच्छ न करणारे फिल्टर देण्यात आले. हा प्रयोग सुमारे चार आठवडे करण्यात आला. यावेळी प्रत्यक्ष एअर फिल्टरमुळे खोलीतील हवेतील अतिशय बारीक प्रदूषित कणांचे प्रमाण जवळपास 36 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.

या काळात सहभागी लोकांच्या रक्तातील साखरेवर विशेष उपकरणांच्या मदतीने लक्ष ठेवण्यात आले. या उपकरणांमुळे दिवसभरात रक्तातील साखरेची पातळी किती वेळा आणि किती बदलते, याची माहिती मिळाली. संशोधनात असे आढळले की, स्वच्छ हवेचा संपर्क मिळालेल्या लोकांच्या रक्तातील साखरेतील चढ-उतार कमी झाले. विशेष म्हणजे, सकाळी नाश्ता केल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याचे प्रमाणही कमी दिसून आले. नाश्त्यानंतर साखरेची पातळी जितकी जास्त वाढत होती, त्यातही घट नोंदवण्यात आली.

संशोधकांच्या मते, घरातील हवा शुद्ध ठेवल्याचा फायदा शरीराच्या चयापचय प्रक्रियेला होऊ शकतो. त्यामुळे प्री-डायबिटीज असलेल्या लोकांनी घरातील, विशेषतः बेडरूममधील हवेच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, एअर प्युरिफायर हा मधुमेहावरील उपचार नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला यांची जागा तो घेऊ शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोणत्याही आमदाराला फोन अथवा मेसेज आलेला नाही - आमदार संग्राम जगताप

७ कोटींचा व्हिला, ५० तोळं सोनं अन् २५ एकर जमीन; सरकारी इंजिनिअरच्या घरात सापडलं घबाड, ACB ची १० ठिकाणी धाड

River Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली व्हॅन नदीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू

नागपूर शहराला 'संत्र्याचे शहर' का म्हणतात?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं नाव बदलणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT