WhatsApp Secret Features Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Secret Features : व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या सिक्रेटपासून राहा सावध! नाहीतर, आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

WhatsApp New Update : मेटाने तयार केलेले इंस्‍टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर सतत नवनवीन अपडेट येत राहतात.

कोमल दामुद्रे

WhatsApp Hacks : जगभरातील ९० टक्के लोक हे व्हाट्सएप फोनमध्ये वापरतात. मेटाने तयार केलेले इंस्‍टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वर सतत नवनवीन अपडेट येत राहतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर जगभरातील लाखो वापरकर्ते चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी आता व्हॉट्सअ‍ॅपने नवं सिक्रेट फिचर्स अपडेट केल आहे.

खरेतर WhatsApp चा वापर करताना त्याच्या सुरक्षतेची देखील काळजी घ्यायला हवी. नाहीतर बँकिंग फसवणुकीला बळी पडू शकता. तसेच अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगात जावे लागू शकते. या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर या गोष्टींची नेहमी काळजी (Care) घ्यावी.

1. टू-स्टेप व्हेरिफिकेशन

WhatsApp वापरकर्त्यांनी त्यांच्या खात्यात टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू ठेवायला हवे. यामुळे कोणीही तुमचे अकाउंट सहज हॅक करू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप खाते रीसेट आणि पुन्हा वापरण्यासाठी 6 अंकी पिन आवश्यक आहे. यामुळे स्कॅमपासून आपले संरक्षण होईल.

2. अनोळखी अकाउंट ब्लॉक करा

व्हॉट्सअ‍ॅपवर अनोळखी अकाउंटवरून (Account) मेसेज येत असतील तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारत असेल, तर तुम्ही सतर्क राहायला हवे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहा. अशावेळी अकाउंट ब्लॉक करणे गरजेचे आहे. व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी सेटिंग आणि ग्रुप इनव्हाइट सिस्टममध्ये देखील तुम्ही ब्लॉक करु शकता

3. ग्रुप प्रायव्हसी

ग्रुप प्रायव्हसीच्या मदतीने ठरवू शकता की, तुम्ही कोणला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकता आणि कोणाला नाही. अशा परिस्थितीत विनाकारण कोणीही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही. तुम्हाला ग्रुप चॅटमध्ये काहीतरी चुकीचे वाटल्यास त्याची तक्रार करा आणि ग्रुपमधून बाहेर पडू शकता.

4. वैयक्तिक माहिती शेअर करू नका

वापरकर्त्यांनी WhatsApp वापरताना त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करू नये. वापरकर्त्यांनी त्यांचा पत्ता, फोन नंबर, पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड क्रमांक, बँक खात्याची माहिती शेअर करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

Success Story: २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोवर्स; IPS सचिन अतुलकर आहेत तरी कोण?

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

SCROLL FOR NEXT