April Travel Destination  Saam Tv
लाईफस्टाईल

April Travel Destination : उन्हाळ्यात फिरा निसर्गरम्य पर्यटनस्थळी, या भन्नाट ठिकाणांना नक्की भेट द्या

Best Tourism Places : मार्च-एप्रिल महिना सुरु झाला की, शाळा कॉलेजला सुट्टी लागते. अशावेळी अनेकांना फिरायला जायला आवडते तर काहींना ट्रेकिंगला. यासाठी आपण ट्रिप प्लान करतो.

कोमल दामुद्रे

Summer Travel Trip :

मार्च-एप्रिल महिना सुरु झाला की, शाळा कॉलेजला सुट्टी लागते. अशावेळी अनेकांना फिरायला जायला आवडते तर काहींना ट्रेकिंगला. यासाठी आपण ट्रिप प्लान करतो.

उन्हाळ्यात (Summer Season) अनेकजण फिरायला जाण्यासाठी पर्यटनस्थळे सर्च करतात. मुंबई, गोवा, मनाली, महाबळेश्वर आणि चिखलदरा इत्यादी ठिकाणांनी आपण नेहमीच भेट देतो. पण या ठिकाणांना भेट देऊन कंटाळले असाल तर तुम्ही हिमालयातील या भन्नाट पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता.

1. काश्मीर

मार्च-एप्रिलमध्ये तुम्ही काश्मीरला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला हिरव्यागार दऱ्या पाहायला मिळतील. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पहलगाम, गुलगर्म, सोनमर्ग अशी अनेक ठिकाणे (Travel) पाहायला मिळतात.

2. पचमढी

जर तुम्हाला हिल स्टेशनला (Hill Station) फिरायला जायचे असेल तर तुम्ही हिमालयातील पचमढीला जाऊ शकता. सातपुडा टेकडीवर वसलेल्या पचमढीच्या शिखरावरुन दूरवर दिसणारे हिरवेगार दृश्य मनमोहक दिसतात. पचमढीला आल्यावर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखे वाटेल.

3. उटी

हनिमून डेस्टिनेशनसाठी तुम्ही उटीला जाण्याचा प्लान करु शकता. तसेच तुम्हाला फिरायला जायचे असेल तर कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणीसोबत फिरु शकता. एप्रिल महिन्यात उटी फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे.

4. मेघालय

मेघालय हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. येथे कमी अंतरावर धबधबे पाहायला मिळतील. येथे तुम्हाला ट्रेकिंगही करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT