ऑक्टोबरच्या गर्मी नंतर आता हिवाळ्याचा महिना सुरु होणार आहे. त्याचबरोबर पर्यटक हिवाळ्याच्या सुट्टीत बाहेर जाण्याचे प्लान करत असतात. प्रत्येकजण आपल्या जीवनात व्यस्त असल्याने सर्वांना आपली सुट्टी बाहेर जाऊन एन्जॅाय करायची असते. प्रत्येकाला मनाच्या शांतीची त्याचबरोबर जीवनात विसावा घेण्याची गरज असते. पण एका दिवसाच्या सुट्टीपेक्षा लांब वीकेंड सर्वांसाठी खूप खास असतात. म्हणून पर्यटक जवळच्या ठिकाणांच्या शोधात असतात. अशाच पर्यटकांसाठी आम्ही मुंबईमधील हिवाळ्याच्या सुट्टीतील पर्यटन स्थळांची माहिती घेऊन आलो आहोत. या माहितीमुळे पर्यटकांना बाहेरगावी जाण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर त्यांना मुंबईमध्येच सुंदरसा हिवाळा सीझन अनुभवता येणार आहे. म्हणून पर्यटकांनी सुट्टयांचा पुरेपुर आनंद घेऊन हिवाळ्यातील या पर्यटन स्थळांना नक्की भेट दिली पाहिजे. जाणून घेऊया मुंबईजवळील काही उत्तम ठिकाणे.
माथेरान
पर्यटकांसाठी मुंबईजवळील माथेरान एक उत्तम ठिकाण आहे. माथेरान एक हिल स्टेशन असल्याने वींकेड सुट्टीचा पुरेपुर फायदा पर्यटक घेऊ शकता. माथेरान समुद्रसपाटीपासून २६०० किलोमीटर अंतरावर आहे, आणि त्याबरोबर मुंबई शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर आहे. माथेरान हिल स्टेशन पर्यटकानां त्याच्या मनमोहक दृश्यांमुळे आणि सुंदर वातावरणामुळे, शांततेमुळे आकर्षित करत आहे. माथेरान हिल स्टेशनमध्ये पर्यटकांना ३६ व्ह्यूपॅाईंट्स पाहायला मिळणार आहेत.
अलिबाग
महाराष्ट्रातील अलिबाग शहर समुद्रकिनारे, सुंदर दृश्ये आणि व्हिला यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. अलिबाग शहर वीकेंडच्या सुट्टीसाठी खूप लोकप्रिय आहे. पर्यटकांना हिवाळ्याच्या सीझनमधील अलिबागचे सुंदर दृश्य पाहता येणार आहे. त्याचबरोबर पर्यटकांना पॅरोसेलिंग ,बोट यांसारख्या अनेक राईड्सचा अवुभव घेता येणार आहे. पर्यटकांसाठी अलिबाग एक मिनि गोवा आहे. म्हणून पर्यटकांनी हिवाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अलिबाग शहराला नक्की भेट द्यावी.
गणपतीपुळे
कोकण शहरातील रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे एक पर्यटन स्थळ आहे. हिवाळ्याच्या सुट्टीसाठी गणपतीपुळे फार उत्तम आहे. पर्यटकांना गणपतीपुळेला भेट दिल्यावर गणपतीचे भव्य मंदिर आणि समुद्रकिनारा अनुभवता येणार आहे. गणपतीपुळे शहर त्याच्या शांततेमुळे आणि समुद्रकिनाऱ्यामुळे सर्वांना आकर्षित करत आहे. निसर्गाच्या सानिध्यात गणपतीमुळे एक उत्तम रमणीय गेटवे आहे. पर्यटकांना गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर अनेक राईडस सुद्धा अनुभवता येणार आहेत.
तारकर्ली
हिवाळ्याच्या सीझनमध्ये तारकर्ली ठिकाण फार उत्तम आहे. तारकर्ली हे महाराष्ट्रातील एक विलक्षण गाव आहे. तारकर्लीमध्ये पर्यटकांना बॅकवॅाटर,मंदिरे आणि समुद्रकिनारे पाहायला मिळणार आहे. पिकनिक आणि वींकेड ट्रिप एन्जॅाय करण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने तारकर्लीला येत असतात. तारकर्ली ठिकाण त्याच्या सुंदर दृश्यांमुळे सर्वांना आकर्षित करत आहे. तारकर्लीमध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटकांना तारकर्लीमध्ये खूप अनोख्या गोष्टीचा अनुभवता येता येणार आहे.