Mumbai-Pune Travel Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Mumbai-Pune Travel Plan : मुंबई-पुण्याजवळ फिरण्याचा प्लान करताय? IRCTC चे भन्नाट टूर पॅकेज पाहा

Summer Travel Trip : उन्हाळा सुरु झाला की, अनेकांना फिरण्याचे वेध लागतात. शाळा-कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आपण देखील काही ट्रिपचे नियोजन करतो. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी आपण अनेक पर्यटनस्थळे पाहातो.

कोमल दामुद्रे

IRCTC Tour Package :

उन्हाळा सुरु झाला की, अनेकांना फिरण्याचे वेध लागतात. शाळा-कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आपण देखील काही ट्रिपचे नियोजन करतो. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी आपण अनेक पर्यटनस्थळे पाहातो.

जर तुम्हाला मुंबई (Mumbai)-पुण्यालगत फिरायचे असेल तर आयआरसीटीसी तुमच्यासाठी भन्नाट टूर प्लान घेऊन आली आहे. यामध्ये तुम्ही फॅमिली, पार्टनर आणि मित्र-परिवारासोबत फिरु शकता. जाणून घेऊया या टूर (Tour) पॅकेजबद्दल

1. नाशिक, शनी शिंगणापूर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर

या पॅकेजची सुरुवात पुण्यापासून सुरु होणार आहे. यामध्ये तुम्हाला मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी तिकीटे बुक करता येतील. या पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतील. हे पॅकेज २ रात्री आणि ३ दिवसांसाठी आहे. सोलो ट्रिप (Trip) करत असाल तर तुम्हाला २०, ५९० रुपये, पार्टनरसोबत जात असाल तर प्रति व्यक्तीसाठी १०,४९० रुपये, फॅमिलीसोबत जात असाल तर प्रति व्यक्तीला ९,२९० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच मुलांसोबत फिरायला जात असाल तर प्रति व्यक्तीसाठी ६,१९० रुपये मोजावे लागतील. या पॅकेजमध्ये नाशिक, शनी शिंगणापूर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी फिरता येईल. तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत साइट्सला भेट द्यावी लागेल.

2. अहमदाबाद टूर पॅकेज

हे टूर पॅकेज मुंबईतून सुरु होत असून याचे तिकीट तुम्हाला बुधवारी बुक करता येईल. पॅकेज ४ रात्री आणि ५ दिवसांसाठी असणार आहे. तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर तुम्हाला ४१,७९० रुपये मोजावे लागतील. कपल्स जात असाल तर प्रति व्यक्तीसाठी २४,०८० रुपये भरावे लागतील. फॅमिलीसोबत जात असाल तर प्रति व्यक्तीला २०,०६५ रुपये मोजावे लागणार आहे. तुमच्यासोबत लहान मुले असतील तर १७,७४५ रुपये द्यावे लागतील. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अहमदाबादमधील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

SCROLL FOR NEXT