Gaming Smartphone Under 20000 Gaming Smartphone Under 20000 - Saam Tv
लाईफस्टाईल

Gaming Smartphone Under 20000: गेमिंग लव्हर्ससाठी जबरदस्त बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, पाहा लिस्ट

Gaming Smartphone Under 20k Rs: गेम खेळण्यासाठी चांगला स्मार्टफोन हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. गेमिंग करण्यासाठी स्मार्टफोनमध्येही चांगले फिचर्स, आवश्यक स्टोरेज , रॅम असायला हवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Best Gaming Smartphone Under 20000:

संपूर्ण जग टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. यात स्मार्टफोन खूप जास्त महत्त्वाचे आहेत. स्मार्टफोनमुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती आपल्याला एका क्लिकवर करते. याचसोबत स्मार्टफोनमुळे खूप जास्त फ्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. त्यातील एक म्हणजे गेमिंग. सध्याची तरुण पिढी खूप जास्त गेमिंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय दिसते.

गेम खेळण्यासाठी चांगला स्मार्टफोन हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. गेमिंग करण्यासाठी स्मार्टफोनमध्येही चांगले फिचर्स, आवश्यक स्टोरेज , रॅम असायला हवा. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशा बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची माहिती देणार आहोत जे गेमिंगसाठी अत्यंत परफेक्ट आहेत.

Samsung Galaxy M24 5G

सॅमसंग कंपनी नेहमीच नवनवीन फोन बाजारात लाँच करत असते. युजर्सच्या गरजेनुसार फोन बाजारात येत असतात. त्यातील एक फोन म्हणजे Samsung Galaxy M24 5G. सॅमसंगच्या या फोनमध्ये तुम्हाला 6.6 इंचाचा FHD+LCD डिस्प्ले मिळेल. हा फोन ऑक्टोकार एक्सीनोस 1330 प्रोसेसवर काम करेल. फोनची बॅटरी 6000mAh आहे. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनची किंमत 15,990 आहे.

Techno Pova 5 Pro

Techno Pova 5 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा FSD+ डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन MediaTek Dimension 6080 chipset वर काम करेल. स्मार्टफोनमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे.

IQOO Z7s 5G

गेम खेळण्यासाठी हा एक उत्तम स्मार्टफोन आहे. यात 4500mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 695 प्रोसेसरवर काम करेल. फोनमध्ये 6.38 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G

स्मार्टफोनमध्ये One Plus हा चांगला ब्रँड आहे. या फोनची किंमत 17,999 रुपये आहे. यात 6.59 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Snapdragon 695 चिपसेट आणि 5000mAh बॅटरी आहे.

Redmi Note 11T 5G

गेमिंगसाठी हा स्मार्टफोन खूप चांगला आहे. यात 5000mAh बॅटरी आणि 6.6 इंच HD Plus LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरवर काम करतो. याची किंमत 17,999 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT