Benefits Of Lemon Tea : वजन कमी करण्यासाठी आपल्याला लिंबाचा अधिक फायदा होतो. मध व पाणी यांचे पेय बनवून आपण त्याचे सेवन करु शकतो.
बदलेल्या जीवनशैलीनुसार वजन कमी करण्यासाठी सगळेच जण गरम पाण्यात लिंबू पिळून त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे दिवसभर आपल्याला हायड्रेट राहण्यास मदत होते व आपल्या शरीरातील विघटक निघून जाण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या चहाचे सेवन करतो. कधी ग्रीन टी तर कधी खाण्यापिण्यात बदल करतो. परंतु, सध्या लिंबाच्या चहाचे सेवन अधिक केले जाते. याचे सेवन केल्यामुळे चयापचय वाढते व कॅलरी कमी होण्यास मदत होते.
लिंबू हा जीवनसत्त्व (Vitamins) क चा चांगला स्त्रोत आहे. त्याची चव व सुगंधामुळे आपल्याला आराम मिळतो. तसेच मन शांत राहण्यास मदतही मिळते. या चहातील अँटिऑक्सिडंट्समुळे विघटक काढून टाकण्यात आणि जळजळ कमी करण्यात मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी लिंबू चहाचे फायदे कसे होतात हे जाणून घ्या
१. चयापचय गतिमान करते -
ज्यावेळी आपल्या साखरयुक्त (Sugar) पेय प्यावेसे वाटते तेव्हा आपण लिंबाच्या चहाचे सेवन करायला हवे. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर निघाल्यामुळे चयापचय गतिमान होण्यास मदत होते. डिटॉक्ससाठी व कॅलरी प्रतिबंधासह लिंबाच्या चहा पिल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास आणि रजोनिवृत्तीपूर्व महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.
२. प्रतिकारशक्ती वाढवा -
जीवनसत्त्व 'क' ने समृद्ध असलेल्या लिंबाचा आपल्या शरीराच्या ऊतींच्या वाढीसाठी, दुरुस्तीसाठी आणि विकासासाठी महत्वाचा आहे. तसेच याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. जीवनसत्त्व क लोहाची कमतरता टाळण्यासाठी, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
३. भूक नियंत्रणात आणण्यासाठी -
लिंबाच्या चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्मांनी युक्त असे ते पेय बनते. याचे सेवन केल्याने मळमळ आणि स्नायूच्या वेदना कमी होतात. तसेच भूक देखील नियंत्रणात राहाते. तसेच आल्यामुळे आपली ऊर्जेची पातळी वाढते व पचनास मदतही होते.
४. कमी कॅलरीज -
दूध आणि साखर नसलेल्या लिंबू चहामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. याचे आवडीनुसार सेवन केल्यास आपल्याला वजन कमी करण्यास फायदा होईल.
५. डिटॉक्स ड्रिंक -
लिंबूमधील सायट्रिक ऍसिड पचनाचे कार्य सुधारते. मूत्रपिंड आणि यकृत डिटॉक्सिफाय करते. हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये ऍसिडिटीचा प्रतिकार करते. तसेच पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी आपले शरीर योग्यरित्या कार्य करत राहण्यासाठी हे आवश्यक आहे. लिंबाचा चहा शरीराला हायड्रेट करते आणि अतिरिक्त सोडियम काढून टाकते ज्यामुळे शरीराल सूज येऊ शकते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.