Guava Leaves Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Guava Leaves Benefits : पेरुच्या पानांचे आरोग्यास आहेत असंख्य फायदे, वाचून व्हाल थक्क...

पेरुची चव ही गोड व काही अंशी तुरट असते. याच्या सेवनाचे फायदे आपल्या सर्वांनाच माहित आहे.

कोमल दामुद्रे

Guava Leaves Benefits : पेरुची चव ही गोड व काही अंशी तुरट असते. याच्या सेवनाचे फायदे (Benefits) आपल्या सर्वांनाच माहित आहे. जितके फायदे पेरुचे आहेत तितकेच फायदे त्याच्या पानांचे देखील आहे. पेरूच्या पानांमध्ये भरपूर औषधी घटक असतात, जे आपले आरोग्य राखण्याचे काम करतात.

NCBI च्या मते, पेरूची पाने एक नैसर्गिक औषध म्हणून काम करतात, ज्यामुळे शरीराला हानी न होता आपल्याला निरोगी बनवते. त्यात अँटिऑक्सिडेंट, अँटीबैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यासोबतच या पानांमध्ये पॉलिफेनॉल, कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन रसायने आढळतात, जे विविध रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पेरूच्या फळाबरोबरच त्याच्या बिया, साल आणि पाने हे सर्व आरोग्य गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. पेरूच्या पानांचा अर्क हा जगातील विविध भागांमध्ये पारंपारिक औषधांचा एक भाग आहे. जपानमधील लोक औषधी गुणधर्म असलेल्या हर्बल टी बनवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करतात. याचे फायदे आपल्याला कसे होतात हे जाणून घेऊया

१. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते

पेरूच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. पेरूच्या पानांमध्ये असलेले फिनोलिक कंपाऊंड शरीरात तयार होणारी अतिरिक्त साखर (Sugar) नियंत्रित करण्याचे काम करते.

२. वजन कमी करण्यास मदत

पेरूच्या पानांमध्ये अनेक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात, जे तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्सचे शोषण रोखून काम करतात. तसेच, ते शरीरातील साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

३. खराब कोलेस्ट्रॉल कमी करते

पेरूची पाने हायपरग्लाइसेमिया कमी करण्यास देखील मदत करतात म्हणजेच साखरेचे प्रमाण जास्त आहे, जे कोलेस्ट्रॉल रोखण्यास मदत करते. याशिवाय, पेरूच्या पानांमध्ये हायपोलिपिडेमिक गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे शरीरातील लिपिड्स ही कमी होऊ शकते.

४. अतिसारात फायदेशीर

पेरूच्या पानांमध्ये अतिसार विरोधी गुणधर्म असतात. यासोबतच पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटी-हेल्मिंथिक गुणधर्म पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करतात तसेच, हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.

५. शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत

पेरूच्या पानांच्या मदतीने शुक्राणूंची संख्या देखील सुधारली जाऊ शकते. यासोबतच पेरूची पानेही प्रजनन क्षमता वाढविण्यास सक्षम मानली गेली आहेत. पेरूच्या पानांच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा शुक्राणूंच्या विषारीपणावर फायदेशीर प्रभाव पडतो, ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : गौरी आगमनाला सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा सर्वात मोठी घसरण; २४, २२ अन् १८ कॅरेटचे नवीन दर जाहीर

Maharashtra News Live Update: धाराशिव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांचा राडा

Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना होत्याचे नव्हते झाले, एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

Puran Poli Recipe : पहिल्याच प्रयत्नात बनवा मऊसूत पुरणपोळी; गणपतीला दाखवा नैवेद्य, चव चाखतच राहाल!

Diabetes and liver damage: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसू लागली तर व्हा सावध; डायबेटीसमुळे लिव्हर होतंय खराब

SCROLL FOR NEXT