Egg Hair Mask Saam Tv
लाईफस्टाईल

Egg Benefits For Hair : केसातील कोंड्यापासून त्रस्त आहात? सतत केस कडक होतात, हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

Hair Falls Issue : बदलेली जीवनशैली, प्रदूषण आणि खराब वातावरणाचा केसांवर परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Egg Hair Mask :

अंडी ही शरीरासाठी अधिक चांगली मानली जातात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात खातात. अंड्यापासून ऑम्लेट, भुर्जी, सँडविच आणि इतर अनेक पदार्थ बनवले जातात. त्यात असे अनेक पोषक तत्व आढळतात, जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.

पण हिच प्रोटीनयुक्त अंडी केसांना निरोगी ठेवतात. ज्यामुळे केसांना अनेक प्रकारचा फायदा होतो. बदलेली जीवनशैली, प्रदूषण आणि खराब वातावरणाचा केसांवर परिणाम होतो. ज्यामुळे केस तुटणे, गळणे, केसांत कोंडा होणे किंवा त्याची वाढ खुंटणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

जर तुमच्याही केसात (hair) सतत कोंडा (Dandruff) होत असेल आणि महागड्या उत्पादनांपासून वैतागले असाल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय (Home remedies) सांगणार आहोत. ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचे रुक्ष झालेले केस सॉफ्ट आणि शाइन करु शकता. कसे ते पाहूया

1. केसांच्या वाढीसाठी उपयुक्त

प्रथिनेयुक्त अंडी तुमच्या टाळूचे पोषण करतात. अंड्यातील पिवळ बलक आणि पांढऱ्या पदार्थांने केसांना मसाज करू शकता. यामुळे तुमचे केस वाढतील. केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा अंडी टाळूवर लावू शकता, यामुळे केस गळणेही नियंत्रणात येईल.

2. केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करा

बदलत्या ऋतूत अनेकदा केस खूप रुक्ष आणि निस्तेज होतात. अंड्यांमध्ये नैसर्गिक केराटिनसह प्रोटीन असते जे केसांना नुकसान होण्यापासून वाचवते. यासाठी अंड्याच्या पांढऱ्यामध्ये थोडे ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल मिसळा. केसांना लावा, काही वेळाने धुवा.

3. केसांना मॉइश्चरायझर करा

कोरड्या स्कॅल्पची समस्या असलेल्या लोकांसाठी अंडी खूप फायदेशीर ठरू शकतात. केसांना मास्क तयार करण्यासाठी, एका वाडग्यात अंडी फोडून घ्या आणि चांगले पद्धतीने फेटून घ्या. आता त्यात एक किंवा दोन चमचे एरंडेल तेल मिसळा. हे मिश्रण टाळूवर लावा, अर्ध्या तासानंतर शॅम्पूने धुवा.

4. कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त

हा एक कंडिशनिंग हेअर मास्क आहे, ज्याचा वापर करून तुम्ही कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळवू शकता . हा मास्क तयार करण्यासाठी, तुम्हाला एका भांड्यात अंडी फेटावी लागतील, त्यात 1 चमचे लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट केसांवर आणि टाळूवर लावा, सुमारे 20 मिनिटांनी पाण्याने धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

SCROLL FOR NEXT