Beauty Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Beauty Tips : एक चुक अन् पुर्ण लूक खराब, लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

How To Apply Lipstick : लिपस्टिक हे असे प्रोडक्ट आहे जे तुम्हाला सामान्य लूकपासून खास लूक देते.

Shraddha Thik

Beauty Tips :

कॉस्मॅटिक्सच्या जगात, काही गोष्टी आहेत जे वापरल्याने तुमचे रूपच बदलून जाते. म्हणजेच त्यांचा वापर केल्याने तुमचे स्वरूप पूर्णपणे वेगळे दिसू लागते. परंतु तुम्ही त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे खूप महत्त्वाचे आहे.

मेकअप किटमधील एक साधन म्हणजे लिपस्टिक ही काही गोष्टींपैकी एक आहे ज्याचा योग्य वापर केल्यास तुमचा संपूर्ण लुक बदलू शकतो. लिपस्टिक हे असे प्रोडक्ट आहे जे तुम्हाला सामान्य लूकपासून खास लूक देते. थोडीशी लिपस्टिक (Lipstick) तुमचा चेहरा बदलू शकते आणि तुमचा आत्मविश्वास वाढवू शकते.

लिपस्टिक एक केंद्रबिंदू म्हणून काम करते जे कोणाचेही लक्ष वेधून घेऊ शकते. ओठ हा आपल्या चेहऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे, त्यावर योग्य निवडलेली लिपस्टिक लावल्यास त्यांचे सौंदर्य द्विगुणित होते.

ठळक लाल रंग (Colour) असो किंवा मऊ गुलाबी, प्रत्येक रंगाची स्वतःची खासियत असते जी लावल्यानंतर तुमचे व्यक्तिमत्व आणि स्टाईल दोन्ही बदलतात. तुमच्या ओठांवर वाइब्रंट लाल रंगाची लिपस्टिक लावल्याने तुम्हाला आत्मविश्वास मिळतो, तर हलकी आणि न्यूड शेड्स लावल्याने तुमचा साधेपणा दिसून येतो.

लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत -

ओठांवर चांगली लिपस्टिक लावल्याने तुम्ही आकर्षक दिसता. ज्या महिलांचे ओठ खूप पातळ आहेत त्यांनी लिपस्टिक लावल्यास त्यांचे ओठ थोडे जाड दिसू लागतात, ज्यामुळे तुमचा चेहरा (Face) पूर्वीपेक्षा चांगला दिसू शकतो.

ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. लिपस्टिक लावण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या ओठांना चांगले मॉइश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून लिपस्टिक सहज लावता येईल. यानंतर, तुमच्या लिपस्टिकशी जुळणारे लिप लाइनर वापरा. जेणेकरून तुम्ही तुमच्या ओठांच्या कडा स्पष्ट करू शकता.

लिपस्टिक लावताना हे नेहमी लक्षात ठेवा की ते ओठांच्या मधोमध लावायला सुरुवात करा आणि बाहेरच्या बाजूने लावा आणि तुमच्या नैसर्गिक ओठांच्या आकाराचे अनुसरण करा. आता टिश्यूच्या मदतीने अतिरिक्त लिपस्टिक काढून टाका. शेवटी, ओठ चमकदार दिसण्यासाठी लिपग्लॉस वापरा.

त्वचेच्या रंगानुसार योग्य लिपस्टिक निवडा -

गोरा रंग - जर तुमच्या त्वचेचा रंग गोरा असेल तर तुम्ही पीच, न्यूड पिंक, हलका जांभळा रंग किंवा मॅट लिपस्टिक लावू

शकता.

गव्हाचा रंग - जर तुमच्या त्वचेचा रंग गव्हासारखा असेल तर तुम्ही तुमच्या ओठांवर हलके गडद शेड्स लावू शकता.

गडद रंग - जर तुमच्या त्वचेचा रंग गडद असेल तर तुम्ही मरून किंवा ब्राऊन लिपस्टिक लावू शकता. हे तुम्हाला अधिक चांगले दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT