Kidney Disease Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Kidney Disease Symptoms: सकाळी झोपेतून उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर व्हा सावधान, शरीर देतंय किडनी खराब झाल्याचे संकेत

Early Signs of Kidney Disease: सकाळी उठल्यानंतर पायांना सूज येणे, सतत थकवा जाणवणे आणि डोळ्यांच्या आसपास सूज दिसणे ही किडनीच्या समस्यांची संभाव्य लक्षणे असू शकतात. किडनीचे कार्य बिघडल्यास शरीरात कोणते बदल होतात आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. शरीरात साचलेली घाण बाहेर काढण्याचं काम किडनी करते. किडनी रक्तातील घाण आणि टाकाऊ पदार्थ गाळून ते लघवीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकते. पण किडनीचं काम व्यवस्थित सुरू नसेल तर शरीरातील घाण बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ साचू लागतात. याचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवरही होऊ शकतो.

किडनी खराब झाल्यास शरीर काही लक्षणांच्या माध्यमातून संकेत देतं. पण अनेकदा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर शरीरात दिसणारी अशीच काही लक्षणं कोणती ते जाणून घेऊया.

पायांना सूज येणं

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पायांना सूज दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणतीही दुखापत किंवा संसर्ग नसताना पायांना सूज येत असेल तर ते किडनीचं काम व्यवस्थित सुरू नसल्याचं एक लक्षण असू शकतं. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सोडियम बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे शरीरात पाणी आणि सोडियमचं प्रमाण वाढतं.

सतत थकवा जाणवणं

रात्री पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हेही किडनीच्या त्रासाचं एक लक्षण असू शकतं. किडनी रक्तातील घाण आणि टाकाऊ पदार्थ योग्य प्रकारे बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे शरीरात हे पदार्थ साचतात. याचा परिणाम शरीरावर होऊन सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

डोळ्यांच्या आसपास सूज येणं

सकाळी उठल्यानंतर डोळ्यांच्या खाली किंवा आजूबाजूच्या भागात सूज दिसत असेल तर त्याकडेही लक्ष द्या. किडनीचं काम व्यवस्थित सुरू नसल्यास डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेला सूज येऊ शकते. त्याचप्रमाणे लघवीतून प्रोटीन जास्त प्रमाणात बाहेर पडत असेल तरी डोळ्यांच्या आसपास सूज येण्याची शक्यता असते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips for Laundry: घरात वाद आणि पैशांच्या अडचणीचं कारण आहे ओले कपडे; 'या' वेळी चुकूनही घरात कपडे धुवू नका

टीम इंडियात मोठा बदल! अर्शदीपला विश्रांती, तिसऱ्या वनडेत 'या' घातक गोलंदाजाची होणार एन्ट्री?

Maharashtra News Live Update: आंबोली घाटात झाड कोसळले, काही काळ वाहतूक ठप्प

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार वाढ, ४ महिन्यांचे पैसेही मिळणार; पाहा कोणाला फायदा?

Air Pollution Health Tips: दिवाळीनंतर हवेत विषारी धूर! घरच्या घरी फुफ्फुसे कशी सुरक्षित ठेवणार? 'हे' ५ सोपे उपाय करा

SCROLL FOR NEXT