Bank Holidays Saam Tv
लाईफस्टाईल

उद्यापासून सलग ५ दिवस बँका बंद; तातडीची बँक कामे मार्गी लावा

मार्च महिन्याच्या अखेरला या आर्थिक वर्षाचा शेवट होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मार्च महिन्याच्या अखेरला या आर्थिक वर्षाचा शेवट होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष येत्या १ एप्रिलपासून सुरु होणार आहे. मात्र, पहिल्या महिन्यामध्ये बँका ९ दिवस बंद असणार आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, वीकेंड वगळून एप्रिलमध्ये बँका (Bank) ९ दिवस बंद राहणार आहेत. बँका बंद असणार्‍या दिवसांच्या यादीत २ आणि ४ शनिवार तसेच रविवारचा देखील समावेश आहे. १ एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभाचा दिवस असणार आहे आणि त्याच दिवशी महिन्याची पहिली सुट्टी देखील असणार आहे.

हे देखील पहा-

केंद्रीय बँका सुट्ट्यांचे वर्गीकरण 'राष्ट्रीय' आणि 'प्रादेशिक' अशा २ भागात करतात.

पहिल्या श्रेणीमध्ये भारत देशातील बँकांना सुट्ट्या येतात, तर प्रादेशिक श्रेणीमुळे काही राज्यांमधील बँकांच्या शाखा बंद होतात.

एप्रिल २०२२ मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे असणार आहे-

१ एप्रिल: early closing of accounts यामुळे बँका बंद राहणार आहेत. आयझॉल, चंदीगड, शिलाँग आणि शिमला वगळता देशात जवळपास सर्व भागांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

२ एप्रिल: बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढी पाडवा/ उगादी सण/ नवरात्र/ तेलुगु नववर्ष दिन/ साजिबू नोंगमापनबा (चेराओबा) मुळे बँका बंद राहणार आहेत.

४ एप्रिल : सरहूलच्या निमित्ताने रांचीमध्ये बँका बंद राहणार आहेत.

५ एप्रिल : बाबू जगजीवन राम यांच्या वाढदिवसानिमित्त हैदराबादमध्ये बँका बंद राहणार आहेत.

१४ एप्रिल: बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ वैसाखी/ तमिळ नववर्ष दिन/ चेराओबा/ बिजू उत्सव/ बोहाग, बिहू यांमुळे शिलाँग आणि शिमला वगळता देशामधील जवळपास सर्व भागामध्ये बँका बंद राहणार आहेत.

१५ एप्रिल: गुड फ्रायडे/बंगाली नववर्ष दिन (नबावर्षा)/ हिमाचल डे/ विशू/ बोहाग बिहूच्या निमित्ताने देशातील जवळपास सर्व भागात बँका बंद राहणार आहेत.

१६ एप्रिल : गुवाहाटीमध्ये बोहाग बिहूच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहणार आहेत

२१ एप्रिल : आगरतळामध्ये गरिया पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत.

१९ एप्रिल: शब-ए-कदर/जुमत-उल-विदामुळे जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT