Banana Peel Benefits Canva
लाईफस्टाईल

Banana Peel Benefits : चेहऱ्याचा रंग उजवळण्यासाठी फायदेशीर ठरेल केळीचे साल !

केळीसोबत तिच्या सालीचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.

कोमल दामुद्रे

Banana Peel Benefits : बहुतेक वेळा आपण केळी खाल्ल्यानंतर तिचे साल फेकून देतो. परंतु, त्याचे आपल्या त्वचेला अनेक फायदे होतात.

केळीसोबत (Banana) तिच्या सालीचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत. केळीमध्ये असे अनेक घटक आहेत ज्यामुळे आपण अनेक समस्यांवर मात करु शकतो. केळ्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे ब-६, ब-१२, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळतात, जे त्वचेच्या संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जातात.

केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा पदार्थ असतो, जो एक अमिनो आम्ल असतो. रात्री चांगली झोप येण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. जाणून घेऊया त्याचा त्वचेसाठी होणारे फायदे

१. चामखीळीच्या समस्येपासून मुक्ती -

warts Problem

चामखीळांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केळीची साल खूप फायदेशीर ठरते. केळीच्या सालीमध्ये असलेले काही घटक चामखीळीपासून मुक्त होण्यास मदत करते. यासाठी केळीच्या सालीचा तुकडा चामखीळ भागावर रात्रभर ठेवा. असे नियमित केल्यास फायदा होईल.

२. मुरुमांपासून संरक्षण-

Pimples

केळ्याच्या सालीमध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे गुणधर्म मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा नाश करून त्वचेची दुरुस्ती करण्यात मदत करतात. यासाठी आपण केळीचे साल बारीक करून त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता किंवा साल त्वचेवर चोळून वापरू शकता.

३. सुरकुत्या कमी होतील -

Wrinkles Problem

केळीच्या सालीमध्ये असलेले अँटी-मायक्रोबियल (बॅक्टेरिया नष्ट करणारे) आणि अँटी-ऑक्सिडंट (त्वचेची जळजळ कमी करून त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी उपयुक्त)गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी तसेच सुरकुत्या दूर करण्यासाठी फायदेशीर (Benefits) परिणाम देऊ शकतात.

४. सूर्यकिरणांपासून बचाव -

Protection from sun rays

तज्ज्ञांच्या मते, केळीच्या सालीमध्ये फिनोलिक संयुगे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. संशोधनात असेही नमूद केले आहे की फिनोलिक संयुगे त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यामुळेच केळीचा फेस पॅक चेहऱ्यावर नियमितपणे वापरल्याने सूर्यापासून होणार्‍या अल्ट्रा व्हायलेट रेडिएशनपासून बचाव होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी महापालिका अधिकारी-कर्मचारी संतप्त; महामार्गावर रास्ता रोको

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

High Court: आईपासून वेगळं हो, बायकोच्या हट्टाला नवऱ्याकडून नकार, शेवटी कोर्टानेच दिला मोठा निर्णय

Swara Bhasker: 'मी राणी पद्मावतीला भित्री म्हटलं नाही...'; त्या प्रकरणावरून ट्रोल झालेल्या स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT