Tuesday Remedies Lord Hanuman saam tv
लाईफस्टाईल

Bada Mangal Remedies : चौथ्या बडा मंगलच्या दिवशी करा हे उपाय; भगवान हनुमान दूर करतील आर्थिक स्थिती

Tuesday Remedies Lord Hanuman: आज मंगळवार असून चौथा बडा मंगळ देखील आहे. या दिवशी भक्तांना हनुमानजींची पुजा केली पाहिजे. याशिवाय काही उपाय केले पाहिजेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज ३ जून असून हा ज्येष्ठ महिन्याचा चौथा बडा मंगळ आहे. या दिवशी हनुमानाची पुजा करणं शुभं मानलं जातं. बजरंगबली यांना हिंदू धर्मामध्ये खूप खास मानण्यात येतं. त्यामुळे आजच्या दिवशी जे भक्त हनुमानाची पुजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊ लागतात. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे त्यांनी खास उपाय केले पाहिजेत.

कधीपर्यंत आहे अष्टमी तिथि?

वैदिक पंचांगानुसार, जेष्ठ महिन्याची अष्टमी तिथी काल म्हणजेच २ जून रोजी रात्री ८.३५ मिनिटांनी सुरु झाली आहे. ही तिथी आज म्हणजेच ३ जून रोजी रात्री ९.५६ मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशीचा शुभ मुहूर्त सकाळी ४.०२ पासून रात्री १२.४० पर्यंत असणार आहे.

मंगळ दोषापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय

जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर तुम्ही हनुमानजींची पुजा, व्रत आणि त्यांना काही गोष्टी दान केल्या पाहिजेत. यामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात.

  • आज हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करा आणि त्यांना सिंदूर अर्पण करा.

  • मंगळवारी उपवास करावा आणि शक्य तितक्या हनुमान मंदिरात बुंदी प्रसादाचं वाटप करा.

  • या दिवशी गरिबांना लाल कपडे, मिठाई, डाळ, गूळ, हरभरा या गोष्टींचं दान करा.

  • तुमच्यासोबत लाल रुमाल सोबत ठेवा.

या मंत्राचा करा जप

ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः किंवा ऊँ भौं भौमाय नम: या मंत्राचा 10 हजार वेळा जप करा. जर हे शक्य नसल्यास आजच्या दिवशी कमीत कमी 1100 वेळा या मंत्राचा जप करावा.

शुभ मुहूर्ताची वेळ

ब्रह्म मुहूर्त - पहाटे ०४.०२ ते पहाटे ०४.४३

विजय मुहूर्त - दुपारी ०२.३८ ते दुपारी

०३.३४ गोधूली मुहूर्त - सायंकाळी ०७.१४ ते ०७.३५

निशिता मुहूर्त - रात्री ११.५९ ते १२.४०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT