Ayurvedic benefits of Tulsi for anxiety, stress  Freepik/ Saturn by GHC
लाईफस्टाईल

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Benefits of Tulsi for Anxiety : तुळशीचा नियमित वापर केल्याने तणाव कमी होतो आणि शरिरीक आरोग्य सुधारते. तुळशीतील ऍडॅप्टोजेन नावाचे घटक मानसिक तणावापासून लढण्यास मदत करते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळस एक औषधी वनस्पती आहे जी आरोग्यासाठी खुपच फायदेशीर मानली जाते. तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंम्फेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणूनच केवळ धार्मिक कारणामुळे नाही, तर घरातील प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभण्यासाठी घराबाहेर एकतरी तुळशीचे रोपटे असावे अशी परंपरा मानली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? तुळस आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच ती मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात ऑफिसचे काम, अपूर्ण झोप, चुकीचे राहणीमान, अवेळी खाणे यासगळ्याचा परिणाम फक्त आपल्या शारिरीक आरोग्यावरच नाही, तर मानसिक आरोग्यावरही होतो. डोक्याला सतत ताण जाणवतो ज्यामुळे आपण नैराश्याच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वाढते. महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या मूड स्विंग्समुळे अधिक मानसिक समस्या जाणवतात. शिवाय थायरॉईड आणि हृदयासंबंधित समस्या असल्यासही मानसिक तणाव जाणवतो.

तुळशीमध्ये अनेक असे गुणधर्म असतात जे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. तुळशीतील ऍडॅप्टोजेन नावाचे घटक मानसिक तणावापासून लढण्यास मदत करते. तुळशीचे नियमित सेवन केल्याने मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढते. यामुळे कामामध्ये किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. तुळस कोर्टिसोलची पातळी कमी करते ज्यामुळे मज्जासंस्था शांत राहते व ताण कमी होतो. चांगली झोप लागण्यास मदत होते.

मानसिक तणाव दूर करण्यासाठी अशाप्रकारे तुम्ही तुळशीचा वापर करू शकता :

१. रोज सकाळी ५-६ तुळशीची पाने चघळून खा.

२. चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करा.

३. तुळशीचे तेल अंगाला चोळा किंवा सुगंद घ्या.

४. तुळशीचा अर्क कोमट पाण्यात मिसळून प्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NHAI मध्ये काम करण्याची संधी; समर इंटर्नशिप सुरु; मिळणार स्टायपेंड; वाचा अर्जप्रक्रिया

Gulkand Benefits In Summer: उन्हाळ्यात दररोज १ चमचा 'गुलकंद' खाल्ल्याने शरीरात होतील 5 आश्चर्यकारक बदल

Crime: आईनं पोटच्या मुलीला धावत्या ट्रेनसमोर फेकलं; कारण वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल, CCTV पाहून पोलीस हादरले

शेतीसाठी सिंचन सुविधा ते शिष्यवृत्तीत वाढ; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

Ghatkopar Rickshaw Fire: घाटकोपरमध्ये रिक्षांना अचानक भीषण आग; मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT