Ayodhya Ram Mandir Saam tv
लाईफस्टाईल

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम भक्तांनी दुमदुमली; राम मंदिर लोकार्पण सोहळ्यापर्यंत काय असतील विधी?

Ayodhya Ram Nagri : अयोध्येत येत्या २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.

कोमल दामुद्रे

Ayodhya Ram Mandir Vidhi :

अयोध्येत येत्या २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.

त्यातच अयोध्येमध्ये (Ayodhya) रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राम (Ram) मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. विविध देवतांच्या आवाहनाने या प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात करण्यात आली आहे. विधींसाठी एकूण २१२ वैदिक आचार्यांची निवड करण्यात आली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार आज प्रायश्चित्त विधी आणि कर्मकुटी पूजन करण्यात आले आहे. शरयू नदीच्या तीरावर विष्णुपूजा आणि गोदावरीविधीही करण्यात आला आहे. या कलश यात्रेत सहभागी भाविक तरुणी देखील होते.

आवाहान विधीमध्ये ११ वैदिकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली. कालपासून सुरु झालेले विधी पुढील ६ दिवस म्हणजेच २१ जानेवारीपर्यंत असतील. २२ जानेवारीला मंदिरात (Temple) प्राणप्रतिष्ठापना विधी करण्यात येणार आहे.

1. विधी सोहळा कसा असेल जाणून घेऊया

  • या विधी सोहळ्याबद्दल माहिती देताना मंदिर ट्रस्टने सांगितले की, ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यात विविध सात प्रकारे अधिवास देण्याची पद्धत आहे. त्यापैकी तीन अधिवास देणे आवश्यक असते.

  • बुधवारी १७ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा विधींसाठी एकूण २१२ वैदिक आचार्यांची निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण विधींचे प्रधान हे काशीमधील लक्ष्मीकांत दीक्षित आहेत तर गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या मार्गदर्शनखाली सर्व विधी होणार आहेत.

  • गुरुवारी १८ जानेवारी तीर्थपूजन, जल यात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास विधी करण्यात येणार आहेत.

  • तर शुक्रवारी १९ जानेवारीला औषधाधिवास, केशराधिवास, घृताधिवास आणि धान्याधिवास विधी होतील.

  • शनिवारी २० जानेवारीला शर्कराधिवास, फलाधिवास आणि पुष्पाधिवास होणार आहे. आणि रविवारी २१ जानेवारीला मधाधिवास आणि शैय्याधिवास विधी होणार आहे.

  • सोमवारी २२ जानेवारीला १२ वाजून २० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापनेचा मुख्य विधी सोहळा पार पडेल असे मंदिर ट्रस्टने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हरामखोर गेले पण शिवसैनिक हलला नाही - उद्धव ठाकरे

Shocking: लग्नानंतर देवदर्शनाला गेले असता नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू ; माकडांना पाहून घाबरली, पळत असताना दरीत पडली

मुंबईत ३०००० लोकांचा जीव होता धोक्यात? मोहरम मिरवणुकीतला 'विषारी' कट उधळला, १४,९०० कॅप्सूल जप्त

Mumbai Water Update : मुंबईकरांची चिंता वाढली! पाऊस लांबला, धरणांनी तळ गाठला; सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

July 1 Rule Change : १ जुलैपासून देशात 5 मोठे बदल; LPG, ATM ते HDFC कार्डधारकांवर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT