Right Time For Checking BP saam tv
लाईफस्टाईल

Blood pressure: बीपीचं रिडिंग सतत चुकीचं येतंय? तुम्ही चुकीच्या वेळी तर तपासत नाही ना? वाचा रक्तदाब तपासण्याची योग्य वेळ

Right Time For Checking BP: वास्तुशास्त्रानुसार फ्रिजजवळ काही वस्तू ठेवणं टाळावं असं मानलं जातं. मायक्रोवेव्ह, कचऱ्याचा डबा, औषधांचे डबे आणि आरसा यांसारख्या वस्तू फ्रिजजवळ ठेवाव्यात का? जाणून घ्या फ्रिज ठेवण्याची योग्य दिशा आणि वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड प्रेशर हे तुमच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा इंडिकेटर मानला जातो. ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलं की हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर समस्यांचा धोका निर्माण होतो. कोणतीही समस्या घेऊन जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो त्यावेळी पहिल्यांदा तुमचा बीपी तपासला जातोच. अनेकदा डॉक्टरही घरात बीपीचं मशिन ठेवण्याचा सल्ला देतात. जेणेकरून अडीअडचणीला बीपी तपासून समस्येचा अंदाज लावण्यास मदत होते.

पण तुम्हाला माहितीये का योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तपासलं नाही तर तुमचं रिडिंग चूकू शकतं. बीपी नेमका कधी तपासला पाहिजे हे तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊया बीपी तपासण्याची योग्य वेळ कोणती आहे.

आपल्या शरीरातील रक्तदाब म्हणजेच बीपी दिवसभर एकसारखा राहत नाही. दिवसातील वेगवेगळ्या वेळेनुसार त्यात कमी-जास्त बदल होत असतात. आपण करत असलेली कामं आणि आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम बीपीवर होतो. झोपताना आणि आराम करताना रक्तदाब सर्वात कमी असतो. पण दिवसभरातील कामांमुळे तो हळूहळू वाढतो. दुपारनंतर रक्तदाब सर्वाधिक पातळीवर पोहोचू शकतो.

बीपी तपासण्यासाठी कोणती वेळ योग्य?

सकाळी नाश्ता आणि औषध घेण्यापूर्वी

सकाळची वेळ बीपी तपासण्यासाठी योग्य मानली जाते. कारण रात्रभर विश्रांती घेतल्यामुळे शरीर शांत असते आणि रक्तदाब तुलनेने कमी असतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आधी लघवीला जावं. त्यानंतर साधारण अर्धा तास थांबून बीपी तपासावा. बीपी मोजण्याच्या ५ ते १० मिनिटे आधी कोणतंही श्रमाचं काम किंवा शारीरिक हालचाल करू नये. शांतपणे एकाच जागी बसावं आणि त्यानंतर बीपी मशीनच्या मदतीने रक्तदाब तपासावा. बीपी तपासल्यानंतर नाश्ता आणि औषधे घेऊ शकता.

संध्याकाळी झोपण्यापूर्वी

सकाळी बीपी तपासल्यानंतर दुसऱ्यांदा संध्याकाळी झोपण्यापूर्वीही बीपी तपासावा. यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळच्या रक्तदाबाची तुलना करता येते. दिवसभर काम केल्यानंतर शरीराच्या रक्तदाबात किती बदल झाला आहे हे समजण्यास मदत होते.

व्यायाम न करता शांत बसा

बीपी तपासताना शरीर शांत आणि आरामात असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही नुकताच व्यायाम केला असेल किंवा जास्त शारीरिक हालचाल केली असेल तर लगेच बीपी तपासू नये. कारण अशा वेळी रक्तदाब वाढलेला असू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तरी बीपीची रीडिंग जास्त येऊ शकते. त्यामुळे रक्तदाब तपासण्यापूर्वी काही वेळ शांतपणे बसणं गरजेचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पूर्व, पश्चिम, दक्षिण की उत्तर, घरामध्ये टिव्ही लावण्याची योग्य दिशा कोणती?

Maharashtra News Live Update: मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळचा उल्लेख; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Gold Limit : विवाहित महिलांकडे किती सोनं असावं? आता हिशेब द्यावा लागणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Breaking News : राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेनेच्या २ नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवार गटात करणार प्रवेश

Solapur Airport : सोलापूर विमानतळावर दुर्घटना, उड्डाण घेतानाच विमान घसरलं

SCROLL FOR NEXT