Wedding Loan  Saam Tv
लाईफस्टाईल

Wedding Loan : मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेताय ? 'ही' कागदपत्रे अवश्य सोबत ठेवा

लग्नसराईचा हंगाम सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wedding Loan : लग्नाचं बजेट सहज सांभाळणारी अनेक कुटुंबं आहेत, तर काही लोक असे असतात की ज्यांना लग्नाचा खर्च सांभाळता येत नाही आणि कर्जही घेता येत नाही. तुम्ही लग्नासाठी पैशांची व्यवस्था करत असाल तर बँक तुम्हालाही पैसे (Money) देऊ शकते.

लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. आपलं लग्न इतकं संस्मरणीय व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. त्याचबरोबर लोक आपलं लग्न थाटामाटात करतात. भारतात लग्नसराईवर (Wedding) दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात.

लग्नाचं बजेट सहज सांभाळणारी अनेक कुटुंबं आहेत, तर काही लोक असंही आहेत की ज्यांना लग्नाचा खर्च सांभाळता येत नाही आणि उधारीही घेता येत नाही. मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही लग्नासाठी पैशांची व्यवस्था करत असाल तर बँक तुम्हालाही पैसे देऊ शकते.

वास्तविक, बँकांकडून लोकांना कर्जपुरवठा केला जातो. तुम्हाला लग्नाचं कर्ज हवं असलं तरी तुम्ही बँकेकडून मॅरेज लोनसाठी अर्ज करू शकता. बँकांमध्ये अनेक प्रकारची कर्जे दिली जातात. त्यापैकी एका पर्सनल लोनचा समावेश आहे. या पर्सनल लोन प्रकारात वेडिंग लोनचाही समावेश आहे.

कोणत्याही बँकेत पर्सनल लोन/वेडिंग लोनसाठी अर्ज करायचा असेल तर काही कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते. अनेक बँका प्री-अप्रूव्ह्ड कर्जेही देतात, ज्यात कागदपत्रांशिवायही कर्ज मिळवता येते. पण जर तुमच्याकडे प्री-अप्रूव्ह्ड लोन स्कीम नसेल तर थेट बँकेशी संपर्क साधून कर्ज घेता येईल.

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अनेक कागदपत्रे अत्यंत आवश्यक ठरतात. या कागदपत्रांशिवाय कर्जाचा अर्जही फेटाळला जाऊ शकतो. बँकेकडून पर्सनल लोन/वेडिंग लोन घ्यायचं असेल तर ओळखपत्र (पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इ.) जमा करावं लागेल.

याशिवाय पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आदी) देखील द्यायचा आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट, गेल्या २-३ महिन्यांच्या सॅलरी स्लिप, फॉर्म-१६ आदी द्यावे लागतात. यानंतरच तुमचा कर्जाचा अर्ज फॉरवर्ड होऊन तो मंजूर किंवा नाकारला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 मध्ये CSKवर काळी जादू? थेट BCCIकडे तक्रार; व्हायरल व्हिडिओ आणि पत्राचं सत्य काय?

Rohit Sharma: रोहित शर्मा फीट असूनही प्लेईंग ११ मधून का बाहेर? चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न

लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसही हादरले

Maharashtra News Live Update:- भाजपाला महिला आरक्षण द्यायचं नाही..केवळ राजकारण करायचे आहे - खासदार विशाल पाटील

सहर शेख यांचे नगरसेवक पद जाणार? बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT