Unbalance Hormones Saam Tv
लाईफस्टाईल

Imbalance Hormones : हार्मोन्स इनबॅलन्स झाले आहेत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

How To Balance Hormones : अनियमित जीवनशैलीमुळे महिला त्यांच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Imbalance Hormones : अनियमित जीवनशैलीमुळे महिला त्यांच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. प्रदूषण, अनियमीत आहार यामुळे हार्मोनस इनबॅलन्स होतात. इनबॅलन्स हार्मोनसला सायलेंट किलर देखील म्हणतात.

मूडस्विंग्स आणि स्वभावात चिडचिडेपणा हे बदल महिलांमध्ये (Women) हार्मोन्स इनबॅलन्स दिसून येतो. या समस्या वयाच्या 40 ते 50 वर्षाच्या स्त्रियांमध्ये उद्भवत असतात, परंतु आत्ताच्या वाईट जीवनशैलीमुळे हा बदल 20 ते 30 वयोगटातील महिलांमध्ये बदल दिसून येतो.

व्यस्त आणि अनियमित जीवनशैलीमुळे (Lifestyle) या समस्या निर्माण होतात. तुम्हालाही हार्मोन्स नियंत्रित करायचे असेल तर जाणून घ्या औषधांशिवाय कसा बॅलन्स करता येईल.

हार्मोन्स इनबॅलन्स असण्याची चिन्ह -

  • वारंवार मूड बदलणे

  • कमी झोप, इच्छा कमी होणे

  • अनियमित मानसिक पाळी आणि विलंब

  • चिंताग्रस्त ,तणावग्रस्त

  • चेहऱ्यावरील केस किंवा पुरळ

  • जलद केस गळणे

  • एकटेपणा जाणवणे

औषधांशिवाय असे बरे होईल इनबॅलन्स हार्मोन्स -

जर तुम्हाला हे लक्षन दिसत असतील तर तुम्ही आहारात बदल करून औषधांशिवाय सुद्धा या समस्या दूर करू शकता. जर तुम्हाला खूप जास्त समस्या निर्माण होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

तुमच्या आहारात बदल करून तुम्ही हार्मोन्स इनबॅलन्स नियंत्रित आणू शकतो. त्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात त्याविषयी माहिती जाणून घेऊ.

आहारात या गोष्टींचा समावेश करा -

जर तुम्ही चॉकलेट,कॉफी, चहा, कोल्ड्रिंक्स यांचे जास्त सेवन करत असाल तर त्यामुळे अधिवृक्क ग्रंथी अधिक सक्रिय राहते म्हणून हार्मोन्स बाहेर पडू लागतात. आहारात पोषकघटक उपलब्ध असलेल्या वस्तूंचा समावेश करा.

जेणेकरून तुमच्या शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्व, खजिने, प्रथिने यासारखे पोषक घटक मिळते. गाजर ,कोबी,ब्रोकली अशा ताज्या फळांचा समावेश तुमच्या आहारात करा त्यासोबत इतर फळभाज्यांचा समावेश करा.

शरीरातील पाण्याचे कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज वेळोवेळी पाणी पिणे गरजेचे आहे. थेनाइल हा नैसर्गिक घटक ग्रीन टी मध्ये असतो त्यामुळे तुमचे हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरेल. रोज नारळ पाणी पिणे देखील या समस्येसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या आहारात ओट्स आणि दही चा समावेश करून तुम्ही हार्मोन्स बॅलन्स करू शकता.

या काही भाज्यांपासून दूर राहा -

वांगी, मिरची, बटाटा आणि टोमॅटो या भाज्यांचे सेवन करणे टाळा त्यामुळे तुमचे हार्मोन्स नियंत्रण राहण्यास मदत होईल. रेड मीट,साच्यूरेट आणि हायड्रोजन फॅटयुक्त पदार्थ खाणे बंद करा.

डेरी युक्त पदार्थाचे सेवन टाळून तुम्ही हार्मोन्स इनबॅलन्स सारख्या समस्या पासून मुक्ती मिळवू शकता. गर्भवती महिला जर हार्मोनल समस्यांनी ग्रस्त असतील तर त्यांनी स्टीव्हया टाळा.हा एक नैसर्गिक गोडवा आहे जो नुकसानदायक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT