Realme Phone Discount Saam Tv
लाईफस्टाईल

Smartphone Offers : बजेट युजर्ससाठी आनंदाची बातमी! Realme च्या 'या' पॉवरफुल स्मार्टफोनवर मिळत आहे 5000 रुपयांनी सूट

साम टिव्ही ब्युरो

Realme Phone Discount:

जर तुम्ही एंट्री लेव्हल स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर, Amazon ची ही डील तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. Realme Narzo 50A Prime स्मार्टफोनवर Amazon वर सुरू असलेल्या Realme Narzo Days सेलमध्ये जबरदस्त सूट मिळत आहे. या सेलमध्ये फोन 37 टक्के डिस्काउंटवर विकला जात आहे.

जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुम्हाला यावर सुरु असलेल्या काही ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. या ऑफर्स अंतर्गत तुम्हाला हा फोन अतिशय स्वस्तात मिळणार आहे. Realme चा हा बजेट फोन किती कमी दरात खरेदी केला जाऊ शकतो, हे जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Realme Narzo 50A Prime वर किती रुपयांची मिळत आहे सूट?

ग्राहक Amazon वरून Realme Narzo 50A Prime (64GB + 4GB RAM) ऑर्डर करू शकता. या स्मार्टफोनची किंमत13,499 रुपये आहे आणि तुम्ही सेलमध्ये 5000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त 8,499 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. (Latest Marathi News)

कॅनरा बँक मास्टर कार्ड डेबिटद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय तुम्हाला अनेक ऑफर्सही मिळणार आहेत. तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असल्यास तुम्ही तो Exchange करू शकता. त्याऐवजी तुम्हाला 8,000 रुपयांची सूट मिळू शकते.

Realme Narzo 50A Prime स्पेसिफिकेशन

Realme Narzo 50A Prime मध्ये Android 11 आधारित Realme UI R Edition आहे. यात 6.6-इंच फुल HD+ LCD स्क्रीन आहे. ज्याची ब्राइटनेस 600 nits आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये ARM Mali-G57 GPU सह 12nm Unisoc T612 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 4 GB LPDDR4x रॅमसह 128 GB स्टोरेज आहे.

Realme च्या या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. ज्यात प्रायमरी लेन्स f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल आहे. कंपनीने इतर दोन लेन्सबद्दल माहिती दिलेली नाही. सेल्फीसाठी समोर 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे, ज्याला AI चा सपोर्ट देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या Realme फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5, GPS/A-GPS, 3.5mm ऑडिओ जॅक, Type-C पोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये 18W चार्जिंगसाठी 5000mAh बॅटरी आहे.

डिस्क्लेमर: आम्ही ही बातमी ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिलेल्या एक्सचेंज ऑफर आणि सवलतींच्या आधारे तयार केली आहे. एक्सचेंज ऑफर गॅझेटच्या स्थितीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, कोणतेही गॅझेट खरेदी करण्यापूर्वी, त्याची किंमत निश्चितपणे तपासा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT