Amazon Flipkart Festive Sale Saam Tv
लाईफस्टाईल

ऑफर्सचा पाऊस! Amazon-Flipkart चा फेस्टिव्ह सेलला उरले फक्त काहीच तास, गॅजेट घेण्यासाठी या बेस्ट टिप्स लक्षात ठेवा

Shraddha Thik

Amazon Flipkart Festive Sale 2023 :

सणांचा हंगाम सुरू झाला आहे. सणासुदीच्या काळात लोक भरपूर खरेदी करतात, त्यामुळे अनेक प्रकारच्या विक्री येतात. या मालिकेत Flipkart Big Billion Days Sale आणि Amazon Great Indian Festival Sale देखील सुरू होणार आहेत. दोन्ही आज 8 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि तुम्हाला त्यावर उत्तम ऑफर मिळतील.

अनेकदा वस्तू स्वस्त असताना लोक (People) जास्त खरेदी करतात. यामुळे त्यांचे बजेटही कोलमडते. जर तुम्हीही खरेदीसाठी ई-कॉमर्स साइटच्या मेगा सेलची वाट पाहत असाल, तर येथे जाणून घ्या उत्तम डील मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट ट्रिक्स.

उत्सवादरम्यान तुम्हाला कोणती खरेदी करायची आहे? सर्वप्रथम, वस्तूंची यादी तयार करा जेणेकरून तुम्हाला त्या वस्तूंवर ऑफर (Offer) आणि सवलती मिळू शकतील. प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करा. यासोबतच तुमचे बजेट तयार करा. जेणेकरून खरेदी करताना तुम्हाला तुमच्या बजेटची कल्पना येईल आणि अनावश्यक खर्चापासून स्वतःला वाचवता येईल.

प्रोडक्ट्सची तुलना करा

Amazon-Flipkart व्यतिरिक्त, सणासुदीच्या काळात अनेक ई-कॉमर्स वेबसाइटवर सेल सुरू होतात. या सेलदरम्यान कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, त्याची किंमत आणि गुणवत्तेची इतर वेबसाइटवर तुलना करा. याच्या मदतीने तुम्ही कमी किमतीत चांगली डील मिळवू शकता.

क्रेडिट कार्डवर चांगले डील्स

खरेदी करताना डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरा. मुख्यतः या प्रकारच्या सेलमध्ये क्रेडिट कार्डवर सर्वाधिक ऑफर दिल्या जातात. कधीकधी क्रेडिट कार्डवर अतिरिक्त सवलत उपलब्ध असतात. अशा स्थितीत तुम्हाला एक चांगला डिल मिळू शकेल. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कोणत्याही प्रोडक्टवर नो कॉस्ट ईएमआय सेवा देखील घेऊ शकता.

रश अवर (Rush Hours) वर विशेष लक्ष ठेवा

अशा मेगा सेल दरम्यान, रश अवर वर विशेष ऑफर दिल्या जातात, ज्यामध्ये तुम्हाला जास्त सूट मिळते आणि खरेदी करता येते. अशा डिल्सवर लक्ष ठेवा. याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

जुन्या डिव्हाइसची एक्‍सचेंज करण्यासाठी डील करा

जर तुम्हाला मोबाईल, रेफ्रिजरेटर, एसी, वॉशिंग मशीन किंवा अशी कोणतीही जीवनावश्यक वस्तू घ्यायची असेल तर कधी-कधी तुम्हाला जुनी वस्तू बदलण्याची ऑफर देखील मिळते. ई-कॉमर्स वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही ही ऑफर शोरूमवर देखील मिळवू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही ही ऑफर निवडून पैसे वाचवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT